बिजनौर - उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यात रात्री उशिरा एक कार एका खोल तलावात जाऊन पडली. या अपघातात कारमधील चार जणांचा मृत्यू झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे.
'जिल्ह्यातील नटौर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ अचानक एक कार अनियंत्रित होऊन तलावात कोसळली. यामध्ये चार लोकांचा मृत्यू झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले,' असे बिजनौरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा - देव मुख्यमंत्री झाले तरीही सर्वांना सरकारी नोकरी देणे कठीण; स्वयंपूर्ण मित्र उपक्रमाची सुरुवात
'तलावामध्ये कार कोसळल्याने तन्वीर, छोटू, राजू आणि इसरार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, हनीफ त्याच कारमध्ये असूनही तो सुदैवाने बचावला. कारमधील सर्व लोक बरेलीहून कालियार रुरकीकडे जात होते. जास्त वेगामुळे आणि अचानक आलेल्या वळणामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती तलावात कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,' असे त्यांनी सांगितले.
सर्व मृत बरेली जिल्ह्यातील रवाडी टोला येथील जुने शहर बरदरी पोलीस ठाणे येथील रहिवासी होते.
हेही वाचा - हिंदुत्व चळवळीचा विजय म्हणजे भारतीय विचारांचा विनाश - शशी थरूर