बस्तर (छत्तीसगड) - चार नक्षलवाद्यांनी कोंडगावचे पोलीस अधीक्षक यांच्या समोर आत्मसमर्पण केले. यातील दोघांवर रोख रकमेचे बक्षिसे होती.
कोंडगावचे पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी सांगितले, की या चार जणांत दोन महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेने प्रभावीत झाले होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी सांगितले, की ते माओवाद्यांच्या तत्वाने आणि लोकांना विनाकारण त्रास देण्यामुळे निराश झाले होते. तसेच राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन योजनेने प्रभावीत झाले होते.