ETV Bharat / bharat

राजस्थानातील भीषण अपघातात चौघे जागीच ठार; दोन पोलिसांचा समावेश

बांसवाडाचे सीआय अखिलेश सिंह, त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी आणि दोन महिला कारमधून जात होत्या. यावेळी अखिलेश आणि त्यांचे साथी दोघेही दारुच्या नशेत धुंद होते. यातच त्यांची समोरून येणाऱ्या एका ट्रकला जोरदार टक्कर झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने या चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले...

Four died including two policeman in an accident at rajasthan's pratapgarh
भीषण अपघातात चौघे जागीच ठार; दोन पोलिसांचा समावेश
author img

By

Published : Sep 9, 2020, 7:35 AM IST

जयपूर : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्र. ११३वर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. कार आणि ट्रकच्या या अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि दोन महिलांचा समावेश होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बांसवाडाचे सीआय अखिलेश सिंह, त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी आणि दोन महिला कारमधून जात होत्या. यावेळी अखिलेश आणि त्यांचे साथी दोघेही दारुच्या नशेत धुंद होते. यातच त्यांची समोरून येणाऱ्या एका ट्रकला जोरदार टक्कर झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने या चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळाहून फरार झाला आहे. अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला असून, पोलिसांना गाडी हटवण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली.

हेही वाचा : सीमेपासून केवळ २०० मीटर अंतरावर सशस्त्र चिनी सैन्य; छायाचित्रे व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.