भोपाळ - मध्यप्रदेशात अंगावर भिंत कोसळल्याने ४ मुलांचा मृत्यू झाला आहे. कटनी जिल्ह्यातील उमरियापाना पोलीस ठाणे क्षेत्रातील बनहरा गावात ही घटना घडली. मुलांच्या मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
चारही मुले रस्त्यावर खेळत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर शेजारील भिंत कोसळली. घटनेची माहिती मिळताच विभागीय तहसीलदार हरिंसिंह धुर्वे आणि इतर अधिकरी घटनास्थळी दाखल झाले. चारही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरियापान येथे पाठविण्यात आले आहेत.