नवी दिल्ली - शीला दीक्षित यांचे निधन देशासाठी आणि काँग्रेस पक्षासाठी मोठे नुकसान आहे, अशा शब्दात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, दिल्लीने एक उत्कृष्ट नेता आणि प्रशासक गमावले आहे. दिल्लीच्या परिवर्तनासाठी शीला दीक्षित यांचे मोठे योगदान आहे. यासाठी देश त्यांचे योगदान दीर्घकाळ आठवणीत ठेवेल.