नवी दिल्ली - दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा यांची पत्नी विमला देवी (वय 93 ) यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. 8 जूनला त्या कोरोनाबाधित झाल्या होत्या.
त्यांना एम्स ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते. 18 दिवस त्यांनी कोरोनासोबत झुंज दिली. 26 जूनला त्यांनी कोरोनावर मात केल्याने घरी पाठवण्यात आले होते. हृदय आणि फुफ्फुसाचा विकार वाढत गेले. त्यानंतर काल 15 ऑगस्टला त्यांचे निधन झाले. रविवारी सकाळी लोधी क्रेमेटोरिममध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.