ETV Bharat / bharat

प्रणव मुखर्जींवर आज होणार अंत्यसंस्कार... - प्रणव मुखर्जी अंतिम दर्शन

मुखर्जींना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

Funeral of former President Pranab Mukherjee to be held today
प्रणव मुखर्जींवर आज होणार अंत्यसंस्कार...
author img

By

Published : Sep 1, 2020, 6:20 AM IST

Updated : Sep 1, 2020, 8:51 AM IST

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे काल निधन झाले. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुखर्जींना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

  • With a Heavy Heart , this is to inform you that my father Shri #PranabMukherjee has just passed away inspite of the best efforts of Doctors of RR Hospital & prayers ,duas & prarthanas from people throughout India !
    I thank all of You 🙏

    — Abhijit Mukherjee (@ABHIJIT_LS) August 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत मान्यवर हे सकाळी ९.१५ ते १०.१५ पर्यंत त्यांना पुष्पाहार अर्पण करतील. त्यानंतर इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ४५ मिनिटांचा कालावधी देण्यात येईल. यानंतर दिल्लीमधील १० राजाजी मार्गवर तासाभरासाठी सामान्य नागरिक त्यांचे अंत्यदर्शन घेऊ शकतील. यादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले सर्व प्रोटोकॉल पाळले जातील याची ग्वाही मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचा : राजकारणातील अनेक गुपीतं काळाआड; प्रणव मुखर्जींच्या जीवनप्रवासावर एक दृष्टीक्षेप

Last Updated : Sep 1, 2020, 8:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.