ETV Bharat / bharat

भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांना कोरोनाची लागण - माजी क्रिकेटपटू चेतन चौहान

भारताच्या माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर लखनौ येथील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने या वृत्ताला दुजोरा दिला.

चेतन चौहान
चेतन चौहान
author img

By

Published : Jul 12, 2020, 9:37 AM IST

नवी दिल्ली - भारताच्या माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने या वृत्ताला दुजोरा दिला. चौहान यांच्या कुटुंबीयाची कोरोना चाचणी होणार असून सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

चौहान यांची शुक्रवारी कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्यावर लखनौ येथील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री असलेले चौहान यांनी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (एकदिवसीय) सामन्यांत भारतासाठी निळी जर्सी दान केली होती आणि 40 कसोटी सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते.

चेतन चौहान यांनी 1969 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारताकडून 40 कसोटी आणि 7 वन डे सामने खेळले आहेत. 1981 मध्ये त्यांना अर्जून पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.