ETV Bharat / bharat

सिद्धरामय्यांनी पूर व्यवस्थापनावरून कर्नाटक सरकारला फटकारले - माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या न्यूज

‘मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातूनच तातडीने त्यांच्या जबाबदाऱ्या इतर सहकाऱ्यांकडे सोपवाव्यात आणि सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर तातडीने माहिती घेऊन उपाययोजना कराव्यात. संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणि संबंधित जिल्ह्यांच्या प्रभारी मंत्र्यांना प्रत्यक्षदर्शी अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत’, असे सिद्धरामय्या म्हणाले.

कर्नाटक सिद्धरामय्या न्यूज
कर्नाटक सिद्धरामय्या न्यूज
author img

By

Published : Aug 6, 2020, 5:56 PM IST

बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी ट्विटरवरून बी. एस. येडियुराप्पा सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी पुराचे व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.

‘कर्नाटकात जोरदार पावसामुळे काही ठिकाणची जमीन पाण्याखाली गेली आहे. जनजीवन विसकळीत झाले आहे. लोकांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, सरकार हातावर हात धरून पाहत राहिले आहे,’ असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. ‘राज्यात सरकार आहे का? पुरामुळे केवळ समुद्रकिनारे आणि जवळच्या भागातील लोक संकटात आले आहेत असे नसून, संपूर्ण उत्तर कर्नाटक चिंतेत आहे. राज्य सरकारने तत्परतेने हालचाली करत पीडित लोकांना अन्न आणि निवारा पुरवावा,’ असे ते म्हणाले.

  • There is heavy downpour in various parts of Karnataka, disrupting livelihoods of many people.

    The govt has failed to come to their rescue.

    Do we even have an existing govt?

    1/3#KarnatakaFloods

    — Siddaramaiah (@siddaramaiah) August 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

‘सध्या कोविड-19 च्या साथीचा प्रादुर्भाव झाला आहे. मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्याच्या महसूल मंत्र्यांनाही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांना नुकतेच बृहत बंगळुरू महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले आहे. आयुक्तांना सध्या महसूल खात्याद्वारे अधिकच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यामुळे पूरस्थितीचे नियोजन कोलमडले आहे. बी.एस. येडियुराप्पा यांनी यामध्ये स्वतः लक्ष घालावे,’ असे सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.

  • Govt should immediately take decisions to ease the burden on people during these floods. They should identify shelter homes and relocate people from the risky areas.@CMofKarnataka should immediately distribute the work to ministers and officers.

    2/3#KarnatakaFloods

‘मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातूनच तातडीने त्यांच्या जबाबदाऱ्या इतर सहकाऱ्यांकडे सोपवाव्यात आणि सर्वात महत्त्वाच्या समस्यांवर तातडीने माहिती घेऊन उपाययोजना कराव्यात. संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणि संबंधित जिल्ह्यांच्या प्रभारी मंत्र्यांना प्रत्यक्षदर्शी अहवाल सादर करण्याचे आदेश द्यावेत’, असे ते म्हणाले.

  • Govt had failed to provide relief for the people who had suffered from floods during last Aug-Oct.

    Inspite of our repeated protests, govt had turned a deaf ear.

    But innocent people are paying the price.

    3/3#KarnatakaFloods

‘गेल्या वर्षी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान आलेल्या पुरातून बरेच लोक अद्याप सावरलेले नाहीत. तेथील उपाययोजनात्मक कामेही पूर्ण झालेली नाहीत. आम्ही याबाबत सरकारला सतत इशारा देत आहोत. मात्र, सरकारने काहीच प्रतिसाद दिलेला नाही. राज्य सरकारच्या या दुर्लक्ष करण्यामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत,’ असे सिद्धरामय्या पुढे म्हणाले.

‘गेल्या दोन-तीन दिवसांपासून याबाबत अतिवृष्टीमुळे उडुपी, दक्षिण कन्नड, उत्तर कन्नड, चिकमंगळूर, शिवमोगा, कोडागू आणि हसन येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे,’ अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे संचालक एस. पाटील यांनी गुरुवारी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.