ग्वाल्हेर - मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही मोठे पक्ष ही निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावत आहेत. या दरम्यान, निवडणुकीत प्रचार दौरे मोठ्या जोशात सुरू आहेत. अशात नेते मंडळी आक्षेपार्ह वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. असेच वक्तव्य काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केले आहे.
घडले असे की, ग्वाल्हेरच्या डबरा विधानसभा जागेवर काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांच्यासाठी कमलनाथ यांनी प्रचार दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, त्यांनी मध्य प्रदेशच्या मंत्री आणि भाजपा नेत्या इमरती देवी यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला.
याआधी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी 2013 मध्ये मंदसौर येथे झालेल्या सभेत आपल्याच पक्षाच्या एका आमदाराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. मध्य प्रदेशमध्ये २८ जागावर पोटनिवडणूक होत आहे. यात नेते मंडळी आपल्या जिभेवर ताबा ठेवण्यात अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - हाथरस बलात्कार प्रकरणात पुन्हा एकदा सीबीआयकडून प्रत्यक्षदर्शीची चौकशी
हेही वाचा - देशात होतोय कोरोनाचा सामूहिक प्रसार; अखेर सरकारनेही केले मान्य