नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दाट, उदास धुक्यानंतर आज अनेक दिवसांनी सूर्यदर्शन झाले आणि हवेच्या तीव्र प्रदूषणामुळे सक्तीने विश्रांती घ्यावी लागलेल्या शाळाही सुरू झाल्या. परंतु, दरवर्षी या काळात अशाच प्रकारांची पुनरावृत्ती होत आल्याने दिल्लीतील विदेशी राजनैतिक अधिकारी चिंतीत झाले असून, गेल्या काही आठवड्यात प्रदूषणाचे प्रमाण अत्यंत घातकरित्या असह्य झाले आहे. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या तुकडीचे प्रमुख सध्या प्रवास करत असून, या आठवड्यात ते दिल्लीला परतल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
काही कल्पना आणि पर्यावरणावर उपाययोजना टेबलवर आणतील, अशी आशा आहे. "मी फक्त एवढेच सांगू शकतो की, राजनैतिक अधिकारी त्याच हवेत श्वास घेतात ज्या हवेत दिल्लीचे नागरिक श्वास घेतात आणि इतर प्रत्येकाप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते. यावर परिस्थिती कशी सुधारता येईल, यासाठीच्या कल्पनावर आम्ही परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा करणार आहोत कारण, याचा परिणाम केवळ दिल्लीच्या लोकांवरच होत नाही तर आमच्या देशातील लोक जे भारताला व्यवसाय किंवा पर्यटनासाठी भेट देण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यावर होत आहे.’’ असे फ्रँक एचडी कॅस्टेलानोस यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.
२०१७ मध्ये राजदूत कॅस्टेलानोस यांनी परराष्ट्र मंत्रालयात जाऊन दिल्लीतील हवाई प्रदूषणामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत निषेध करून भारताची राजनैतिक अडचण केली होती. तेव्हा काही दूतावास आणि उच्चायुक्तालयाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला तसेच कुटुंबियांना श्वसन करण्यास त्रास होत असून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याची माहिती दिली होती. दोन आशियाई सदस्य देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना तर आपली दिल्लीतील नेमणूक मुदतीआधीच गुंडाळावी लागली होती, आणि काही अधिकाऱ्यांनी आपल्या सुट्ट्या बराच काळ वाढवल्या होत्या. २०१७ मध्ये थायलंड दुतावासाने आपल्या परराष्ट्र मंत्रालय मुख्यालयास भारतातील नेमणूक अवघड नेमणूक असल्याचे जाहीर करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्यासाठी लिहिले होते तर कोस्ता रिकनचे प्रतिनिधी मारीएला क्रुझ अल्वारेझ यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. तेव्हापासून, दिल्लीतील परदेशी दूतावासानी आपले राजनैतिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत खबरदारी घेण्यास सुरूवात केली.
ईटीव्ही भारतशी बोलताना दिल्लीतील फ्रेंच दूतावासाचे प्रवक्ते रेमी तीरौतोउवारायने यांनी सांगितले की, फ्रेंच दूतावासाने इमारत हवा शुद्ध करण्याच्या साधनांनी सुसज्ज राहील, याची खात्री करण्यासाठी अनेक उपाय योजले आहेत. परिस्थिती असे दर्शवते की, पृथ्वीसाठी भारत आणि फ्रान्स यांची भागीदारी अचूक आहे. गेल्या आठवड्यात आमचे पर्यावरण मंत्री आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या आमसभेसाठी दिल्लीत होते आणि पर्यावरण आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी सहकार्य वाढवण्यावर चर्चा करण्यासाठी मंत्री जावडेकर यांची भेटही घेतली. गेल्या काही वर्षांपासून, चीनी दूतावास आपल्या कर्मचार्याना तोंडावर चढवायचा मुखवटा मिळेल, याची दक्षता घेतानाच दूतावासाच्या प्रत्येक कक्षात दोन हवा शुद्ध करण्याची यंत्रे बसवली आहेत.
माध्यमांशी बोलताना जर्मन राजदूत वाल्टर लिन्डर यांनी रिक्षा चालवणाऱ्यांह ज्याला उपजीविकेसाठी रस्त्यावर उतरावे लागते, अशा सर्वांनाच हवा शुद्ध करण्याचे यंत्र परवडत नाही. दिल्ली सरकारच्या समविषम योजनेला समर्थन देताना लिन्डर म्हणाले की, परदेशी राजदूत असूनही आपणही तसे करू इच्छितो. कोणतेही पाऊल प्रयोगात्मक असले तरीही हवेचा दर्जा सुधारण्यासाठी उचलायला हवे, असे सांगून ते म्हणाले की, इतर देशांनी तसे करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा कल्पनाचा प्रयोग करणे फायदेशीर आहे. दिल्लीतील इतर अनेक परदेशी राजदूत आणि राजनैतिक अधिकार्यांप्रमाणेच, लिन्डर यानाही खराब हवेमुळे काही बैठका आणि भेटी रद्द कराव्या लागल्या किंवा नव्याने वेळापत्रक बनवावे लागले.
"प्रत्येकासाठी सर्वात मूल्यवान असलेल्या आमच्या आरोग्यावर ते परिणाम करत आहे. मी शनिवारचा अख्खा दिवस घरात बसून काढला आणि रविवारी फक्त दोन तास घराच्या बाहेर पडलो. त्याचा आमच्या कामावर परिणाम झाला,’’ असे ट्युनिशियाचे राजदूत नेज्मेदिन लेखक यांनी सांगितले. "दिल्लीत तुम्ही कार्यालयात असताना खिडकी उघडू शकत नाहीत किंवा कर चालवू शकत नाही कारण प्रत्येकासाठी प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. दिल्लीतील लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी खरोखरच मला वाईट वाटते.’’ असे लेखक यांनी पुढे म्हटले.
नागरिकांकडून हवाई आणीबाणीला विरोध..
![Delhi air pollution](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4976382_u_0611newsroom_1573047883_446.jpeg)
खुशी या बारावीतील विद्यार्थिनीने सध्या सुरू असलेला एकमेकांवर दोष ढकलण्याचा खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, असे सांगितले. तर इशा या अकरावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने देशात हवामान विषयक आणीबाणी जाहीर करण्याची गरज असताना पर्यावरण मंत्रालयासाठी निधीची इतकी अल्प तरतूद का, असा प्रश्न विचारला. जर समविषम योजना परिणामकारक आहे, तर मग संपूर्ण वर्षभर का राबवली जात नाही आणि दिवाळीच्या आसपास दरवर्षी हवेचा दर्जा इतक्या खालावल्यावरच खबरदारीचे उपाय का योजले जातात, असे प्रश्न इतरांनी उपस्थित केले.