कुरूक्षेत्र - संपूर्ण देशात आतंराष्ट्रीय गीता महोत्सव थाटामाटात साजरा होत आहे. यानिमित्ताने विदेशातील भाविकही कुरुक्षेत्र येथे पोहोचले आहेत. त्यानंतर ब्रह्मसरोवरच्या किनाऱ्यावर ते गीता जयंतीच्या उत्सवात सहभागी झाले आहेत.
यासोबतच येथील इस्कॉन मंदिरातून देखील भाविक याठिकाणी आले आहेत. सायंकाळी भगवान श्रीकृष्णाच्या आरतीनंतर विदेशी भाविकांनी 'हरे रामा, हरे कृष्णा' भजन म्हणत या महोत्सवात रंगात आणली. यानंतर भाविकांनी ब्रह्मसरोवर परिसरात भ्रमण केले.
यावेळी साइबेरिया वरुन आलेल्या एका भाविकेने सांगितले, त्या गेल्या ५ वर्षांपासून इस्कॉन सोबत जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक वर्षी गीता महोत्सवात सहभागी होऊन ब्रह्मसरोवर येथे येते. तसेच त्या म्हणाल्या, हा एक नवीन अनुभव होता. तसेच श्रीकृष्णाची आरती आणि भजन मला दररोज एक नवीन अनुभूती प्रदान करते.
हेही वाचा - पोलिसांवर हल्ला केल्यानं आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद
तर इस्कॉन मंदिर येथील एका भाविकाने सांगितले, ते स्वत:ला या महोत्सवात सहभागी होण्यापासून थांबवू शकलो नाही. तसेच ते कृष्णाच्या रंगात इतके रंगले आहेत की त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून गेले आहे.