पटणा : बिहारच्या निवडणुका तोंडावर असताना नेते मंडळी एकमेकांवर टीका करण्यात व्यग्र आहेत. अशातच तरुण गायिकांनीही या वादात उडी घेतली आहे. नेहा राठोड आणि मैथिली ठाकूर या तरुण गायिकांमध्ये गाण्यांचं 'वॉर' सुरू झालंय. नेहा सिंह राठोडने यासंबंधी ट्विट करत मैथिलीला लोकांच्या हितांशी तडजोड न करण्याचा सल्ला दिलाय.
काही दिवसांपूर्वी गायिका नेहा सिंह राठोडने एक लोकगीत गायले होते. 'बिहार में का बा'? या नावाने प्रसारित झालेल्या गाण्याच्या व्हिडीयोने सोशल मीडियावर पसंती मिळवली. मनोज वाजपेयी यांच्या 'बंबई में का बा'? या गाण्यावर आधारित हे गाणं आहे. या गाण्यातून नेहा सिंह राठोडने बिहार सरकारला विकास कामांबाबत प्रश्न विचारले होते. याला प्रत्युत्तर देत तरुण गायिका मैथिली ठाकूरने 'बिहार में ई बा'? हे गाणं रेकॉर्ड केलंय. यानंतर गायिकांच्या 'सोशल मीडिया वॉर'ला सुरुवात झाली आहे.
-
#BiharMeKaBa part 1
— Maithili Thakur (@maithilithakur) October 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Penned by: Dr. Chandramani Jha Ji#BiharElections pic.twitter.com/D0BOtfmUGl
">#BiharMeKaBa part 1
— Maithili Thakur (@maithilithakur) October 16, 2020
Penned by: Dr. Chandramani Jha Ji#BiharElections pic.twitter.com/D0BOtfmUGl#BiharMeKaBa part 1
— Maithili Thakur (@maithilithakur) October 16, 2020
Penned by: Dr. Chandramani Jha Ji#BiharElections pic.twitter.com/D0BOtfmUGl
मैथिली ठाकूरने नितीशकुमार आणि भाजपा या सत्ताधाऱ्यांची बाजू घेत बिहारमध्ये झालेल्या विकासाबाबत भाष्य केलं आहे. तर नेहा सिंह राठोडने सरकारच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
-
ला सुना जवाब... का बा बिहार में? pic.twitter.com/L7AW4UyhqZ
— Neha Singh Rathore (@NehaFolksinger) October 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ला सुना जवाब... का बा बिहार में? pic.twitter.com/L7AW4UyhqZ
— Neha Singh Rathore (@NehaFolksinger) October 15, 2020ला सुना जवाब... का बा बिहार में? pic.twitter.com/L7AW4UyhqZ
— Neha Singh Rathore (@NehaFolksinger) October 15, 2020
'एनडीए'चा पाठिंबा
नेहा सिंह राठोडच्या व्हिडिओला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर आता मैथिलीने बिहारमध्ये झालेली प्रगती सांगत नवं गाणं प्रसारित केलं. यानंतर भाजपा पुरस्कृत आघाडीने या गाण्याला समर्थन देत 'मिथिलात काय नाही आहे'?, सर्व काही आहे, असे विरोधकांना सांगितले. काय काय आहे ते येऊन बघा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.