लखनऊ - बसपा अध्यक्ष मायावती यांनी देशातील गरिबांच्या दुर्दशेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गरीबांच्या कल्याणाकडे आपले लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन केले आहे.
देशातील एससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील करोडो लोकांची परिस्थीती दिवसेंदिवस बिकट होत आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच दारिद्रय निर्मुलन योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवावा अशी मागणी त्यांनी टि्वटच्या माध्यामातून केली आहे.
यासोबतच केद्र आणि राज्य सरकारने एक विशेष अभियान चालवून या प्रवर्गातील लाखो रिक्त पदे भरावीत. म्हणजे या लोकांच्या आर्थीक परिस्थितीत सुधारणे होईल. 'देशहितासाठी अशी पावले उचलने अत्यंत महत्वाचे आहे.' असे त्या पुढील टि्वटमध्ये म्हणाल्या.