पाटणा (बिहार) - नेपाळमधून गंडक नदीचे पाणी सोडल्याने बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यात पुराने आणखी हाहाकार उडाला आहे. या पुराचा सुमारे 25 हजार लोकांना फटका बसला आहे
गोपाळगंज जिल्ह्यात गंडक ही नदी धोक्याच्या पातळीच्या आठ मीटर उंचीवरून वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. गेली पाच दिवस नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे. कारण नेपाळमधील वाल्मिकीनगर गंडक नदीचे पाणी सोडण्यात येत आहे.
52 गावातील 25 हजार लोकांना पुराचा फटका
पाण्याचा वेगाने धरणातून विसर्ग केल्याने जिल्ह्यातील 52 गावांना पुराचा फटका बसला आहे तर नदीजवळ असणाऱ्या गावातील पंचवीस हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे
अन्न न मिळाल्याने लोकांचे हाल
पुराचे पाणी घरात शिरल्याने लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुरामुळे दैनंदिन लागणाऱ्या रोजच्या वस्तूंचे आणि अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. परिस्थितीतही लोकांना सरकारकडून मदत मिळाली नाही.
स्थानिक ग्रामस्थ पप्पू यादव म्हणाले, की पुराचे पाणी घरात शिरले आहे. त्यामुळे तांदळाचा साठा खराब झाला आहे. आमच्याकडे जगण्याचे कोणतेही साधन नाही.
नेपाळमधून वाल्मिकीनगर बंधाऱ्यातून 3, 39, 000 क्युसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी करण्यात आला आहे. बरोली, बैकुंठपूर आणि गोपालगंज यासह अनेक गावे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत.