लखनौ - उत्तर प्रदेशच्या शाहजहानपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या एका अपघातात पाच जण जागीच ठार झाले. काल (सोमवार) रात्री हा भीषण अपघात झाला. पुढील गाडीला ओव्हरटेक करताना ही गाडी दरीत कोसळली. त्यामुळे गाडीमधील पाच जण हे जागीच ठार झाले.
सडा गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरीत कोसळलेली गाडी बाहेर काढून त्यामधील मृतदेहांना शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
निगोही पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाडी दरीत कोसळली होती. या गाडीमधून पोलिसांनी पाच मृतदेहांना बाहेर काढले. या सर्व मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.
डॉ. एस चिनप्पा, पोलीस अधीक्षक
या पाच लोकांना रूग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सर्वांचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे, तसेच त्यांच्या मृतदेहांना शवागरात ठेवण्यात आले आहे.
डॉ. मेराज आलम, वैद्यकीय अधिकारी
या अपघातातील मृतांची ओळख पटली असून, हे सर्व शाहजहानपूरचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. जाकिर, अशफाक, गौरव, यामीन आणि लाला अशी या पाच जनांची नावे आहेत. हे सर्व एका लग्न समारंभासाठी बिसलपूरला जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : सूरतमधील कापड मार्केटला लागलेली आग नियंत्रणात..