ETV Bharat / bharat

तृतीयपंथीयांचा पहिलाच विवाह सोहळा कोलकात्यामध्ये, दिपन आणि तिस्ता अडकले विवाहबंधनात - depan and tista marriage

पश्चिम बंगाल राज्यामध्ये पहिला तृतीयपंथीयांचा विवाह सोहळा पार पाडला. वधू तिस्ता आणि वर दीपन या दोघांनीही लग्नगाठ बांधली.

दिपन आणि तिस्ता
author img

By

Published : Aug 7, 2019, 12:56 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगाल राज्यामध्ये पहिला तृतीयपंथीयांचा विवाह सोहळा पार पाडला. वधू तिस्ता आणि वर दीपन या दोघांनीही लग्नगाठ बांधली. तृतीय पंथीयांचा विवाह ही कल्पना अनेकांच्या पचनी पडली नाही. मात्र, या दोघांनी समाजातील विरोध झुगारुन विवाह केला. निवडक नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

लग्नामध्ये वधूने बनारसी साडी घातली होती. तर वराने कुर्ता आणि धोतर घातले होते. १०० जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत दीपन आणि तिस्ता यांचा अनोखा विवाह सोहळा पार पडला.

वधू तिस्ता पुरुष म्हणून जन्माला आली होती. तिचे नाव सुशांत असे होते. मात्र, जेव्हा तिला आपल्यात मुलीचे गुणधर्म असल्याचे जाणवले तेव्हा तिला अस्वस्थ वाटू लागले. तिने मुलगी असल्याचे समाजापुढे जाहीर केले. तिने लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यासाठीही तिला विरोध झाला. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर तिने २००४ साली लिंगबदल शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर ती समाजामध्ये मुलगी म्हणून वावरु लागली.

वर दीपन मुलगी म्हणून जन्माला आला होता. त्याचे नाव कुटुंबीयांनी दिपन्विता असे ठेवले होते. मात्र, दीपनलाही आपण मुलगी नसून मुलगा असल्याची जाणीव झाली. आणि त्याने मुलगा असल्याचे जाहीर केले.

दोघांची ओळख कोलकात्यात नोकरी करत असताना झाली. मैत्रीचे रूपांतर काही दिवसांतच प्रेमामध्ये झाले. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय काही सोपा नव्हता. त्यासाठी त्यांना कुटुंबाचा आणि समाजाचा विरोध पत्करावा लागला.

लिंग बदल करताना शेजाऱ्यांचा आणि नातेवाईकांचा टोकाचा विरोध पत्करावा लागला. माझ्या घरावर त्यांनी हल्ला देखील केला. त्यांनतरही न झुकता मी हे लग्न केले, हे महत्त्वाचे आहे, अशा भावना तिस्ताने व्यक्त केल्या. आमच्या लग्नाद्वारे आम्ही दोघेही इतर लोकांसारखेच सर्वसामान्य असल्याचा संदेश समाजाला जाईल. तृतीयपंथीही समाजाचा भाग आहेत. तेही प्रेमामध्ये पडू शकतात. आपल्या समाजामध्ये सर्व काही शक्य असल्याचे दीपन याने लग्नानंतर मत व्यक्त केले.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.