भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायद्यांतर्गत पहिल्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या बडवानीमध्ये एका तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चार वर्षे लपवला धर्म..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीसोबत गेल्या चार वर्षांपासून संबंध असलेल्या व्यक्तीने आपला धर्म लपवला होता. तसेच, लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यासोबत संबंधही ठेवले होते. लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर या व्यक्तीने आपण मुस्लीम असल्याचे सांगत, तिलाही धर्मांतर करण्यास बळजबरी केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.
संबंध तोडल्यास बदनामीची धमकी..
कोतवाली पोलीस ठाण्याचे इंचार्ज राजेश यादव यांनी सांगितले, की जेव्हा तरुणीला आरोपीच्या धर्माबाबत माहिती मिळाली, तेव्हा तिने त्याच्यासोबत सर्व संबंध तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्या व्यक्तीने तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. यानंतर तरुणीने आपल्या घरी याबाबत सांगितल्यानंतर, तिच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी सोहेल आणि सनी मन्सूरी या दोघांना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : कंगनाकडून लव्ह जिहाद कायद्याचे समर्थन