ETV Bharat / bharat

महिला नौदल वैमानिकांची पहिली तुकडी डॉर्नियर एअरक्राफ्टच्या एमआर मिशनसाठी सज्ज - डॉर्नियर एयरक्राफ्ट नौदल बातमी

भारतीय नौदलातील लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनेंट शुभांगी स्वरूप और लेफ्टनंट शिवांगी यांचे एक पथक डॉर्नियर विमानाच्या एमआर मिशनवर सज्ज झाल्या आहेत. या मिशनसाठी नियुक्ती झालेले महिलांचे हे पहिलेच पथक आहे.

डॉर्नियरच्या एमआर मिशनवर जाण्यासाठी सज्ज

author img

By

Published : Oct 22, 2020, 7:26 PM IST

कोची - भारतीय नौदलातील लेफ्टनंट दिव्या शर्मा, लेफ्टनंट शिवांगी स्वरुप आणि लेफ्टनेंट शुभांगी यांचे एक पथक डॉर्नियर विमानाच्या एमआर मिशनसाठी भरारी सज्ज झाल्या आहेत. डॉर्नियर एयरक्राफ्टच्या मेरिटाइम रेकॉनिसन्स मिशनसाठी नियुक्ती करण्यात आलेले महिलांचे हे पहिलेच पथक आहे.

गुरुवारी रक्षा प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही वैमानिकांनी 'डॉर्नियर विमानाचे परिचलन' केले आहे. 27व्या डॉर्नियर ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग कोर्समध्ये एकूण सहा वैमानिक सहभागी झाले होते. यात या तिन्ही महिला वैमानिक डॉर्नियर विमान परिचलनाचा भाग होत्या असे, दक्षिण नौदल कमांडर यांनी सांगितले. गुरुवारी आयएनएस गरूडमध्ये आयोजित केलेल्या पासिंग आउट समारोहात या तिन्ही महिला वैमानिकांना मरीन रेकॉनिसन्स (एमआर) वैमानिकाची पदवी मिळाली.

यातील लेफ्टनंट शुभांगी ही उत्तर प्रदेशातील तिल्हार येथील रहिवासी आहे. लेफ्टनंट दिव्या शर्मा ही मूळची मालवीय नगर, नवी दिल्ली, तर लेफ्टनंट शिवांगी स्वरुप बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातली आहेत. या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला भारतीय वायुसेनेसह (सॉफ्ट) कोर्सपूर्वी अंशतः नौदलाबरोबर प्राथमिक उड्डाण प्रशिक्षण सुरू केले होते.

बिहारची सबलेफ्टनंट शिवांगी स्वरुप हिने डिसेंबर २०१९मध्ये देशातील पहिली महिला नौदल वैमानिकाचा मान मिळवला. शिवांगी इंडियन नेव्ही फिक्स्ड विंग डॉर्नियर सर्विलांस विमान उडवणार आहे. तिने तिच्या या प्रवासाबाबत ईटीव्ही भारतशी विशेष चर्चाही केली होती.

डॉर्नियर विमान म्हणजे काय -

डॉर्नियर विमान हे सुमारे सहा दशकांपासून भारतीय नौदलात कार्यरत आहे. पाळत ठेवण्याच्या मोहिमेत या विमानाची विशेष भूमिका असते. इंडियन नेव्ही स्वदेशीकरणाला प्राधान्य देते, डॉर्नियर विमान देखील याचेच प्रतीक आहे. ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्येही डॉर्नियरची उल्लेखनीय भूमिका राहिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.