लखनऊ - आपल्या कारनाम्यांमुळे कायम चर्चेत असलेले कौशांबी पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कौशांबीच्या पोलिसांनी चक्क 11 वर्षांपूर्वी मरण पावलेल्या व्यक्तीविरोधात हुंडा मागतिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - VEDIO : लष्कर प्रमुख बिपिन रावत यांचा गोरखाली गाण्यावर डान्स, पाहा व्हिडिओ
याबाबत अधिक माहिती अशी, की मृत व्यक्ती आपल्या सुनेकडे हुंडा मागत होता. तसेच माहेरहून हुंडा आणण्यासाठी मारहाण करत होता, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांची भेट घेतली. मात्र, पोलिसांनी त्यांचे काही ऐकून घेतले नाही. तसेच या प्रकरणातील पोलीस अधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा - मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च समितीची जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट
कोखराज पोलीस ठाणे परिसरातील हर्रायपूर येथे राहणाऱ्या फिरोजचा विवाह दीड वर्षांपूर्वी आलमचंद गावच्या सुफियाशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच फिरोज आणि सुफियामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होऊ लागले. त्यामुळे चिडून सुफिया तिच्या माहेरी गेली. त्यावेळी सुफियाने तिचा नवरा फिरोज, सासू आशिया बेगम आणि सासरे सिराजुद्दीन यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हा फिरोजचे कुटुंबीय गुन्हा दाखल झाल्याचे पाहून चकित झाले. फिरोजचे वडील सिराजुद्दीन यांचा डिसेंबर 2008 मध्ये मृत्यू झालेला असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर फिरोजच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले, की फिरोजच्या वडिलांचा 11 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. ते अशा परिस्थितीत तो आपल्या सूनेकडून हुंडा कसे मागू शकतात. यावर पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.