ETV Bharat / bharat

मुरादनगर स्मशान दुर्घटना : ठेकेदारासह महानगरपालिकेविरोधात गुन्हा दाखल - मुरादनगर दुर्घटना एफआयआर न्यूज

गाझियाबादमध्ये स्मशानभूमीत छत कोसळून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले. या प्रकरणी पोलिसांनी मुरादनगर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निहारिका सिंह, जेई चंद्रपाल, बांधकामाचा सुपरवायजर आशीष, ठेकेदार अजय त्यागी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.

muradnagar
मुरादनगर
author img

By

Published : Jan 4, 2021, 7:48 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये स्मशानभूमीत निर्माणाधीन असलेले छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी मुरादनगर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निहारिका सिंह, जेई चंद्रपाल, बांधकामाचा सुपरवायजर आशीष, ठेकेदार अजय त्यागी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

काय आहे घटना -

गाजियाबादमधील मुरादनगरच्या स्मशानभूमीमध्ये बांधकाम सुरू होते. त्याचवेळी तिथे एक अंत्यविधी देखील सुरू होता. यासाठी लोक स्मशानभूमीत आले होते. अचानक निर्माणाधीन असलेले बांधकाम कोसळ्याने अंत्यविधीला आलेले लोक त्याखाली दबले गेले. ३७ जणांना बचाव पथकाने रेस्क्यू केले होते. आता रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाले आहे. स्मशानभूमीत छताचे बांधकाम होऊन 2 महिने झाले आहेत. त्यांचे काही काम अद्याप बाकी होते. बांधकामामध्ये निकृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर झाल्याने छत कोसळले असावे, असे स्थानिकांनी सांगितले.

नेत्यांनी व्यक्त केला शोक -

या घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी आपण मृतांच्या नातेवाईकांच्या पाठिशी उभे असल्याचे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.