वेदमंत्राचा दाखला देत, 'सबका साथ, सबका विकास' म्हणत भाषणाचा समारोप केला. राग काढण्यासाठी मी विरोधकांच्या कामी आलो याचा मला आनंद आहे. मोदी आहे संधी साधून घ्या असेही मोदी भाषणाच्या शेवटी म्हणाले.
जाणुन घ्या राज्यसभेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले? - , pm modi
![जाणुन घ्या राज्यसभेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले? जाणुन घ्या राज्यसभेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10541404-thumbnail-3x2-modi.jpg?imwidth=3840)
11:48 February 08
भाषणाच्या शेवटी वेदमंत्राचा दिला दाखला
11:43 February 08
आझाद यांच्या कौतुकावरून काँग्रेसला टोला
गुलाम नबी आझाद यांनी जम्मु-काश्मीरातील निवडणुकींचे कौतुक केले. याबद्दल त्यांचे आभार. त्यांचा पक्ष या कौतुकाला खिलाडूवृत्तीने घेईल अशी मी खात्री बाळगतो असे म्हणत मोदींनी काँग्रेसला टोला मारला.
11:37 February 08
नव्या एफडीआयपासून देशाला वाचविले पाहिजे, परदेशी सेलब्रिटींना टोला
- नव्या एफडीआयच्या माध्यमातून देशवासियांची दिशाभूल केली जात आहे.
- हा एफडीआय म्हणजे फॉरेन डिस्ट्रक्टिव्ह आयडियॉलजी आहे, यापासून आपण लोकांना वाचविले पाहिजे असे मोदी म्हणाले.
11:36 February 08
आंदोलनजीवी म्हणत विरोधकांना मारला टोला
- आंदोलनजीवी ही नवी जमात देशात अलिकडे वाढली आहे असे म्हणत विरोधकांवर साधला निशाणा
- हे लोक आंदोलनांशिवाय जिवंत राहू शकत नाही.
- देशाने अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे.
- हे आंदोलनजीवी परजीवी असतात. इथल्या सर्व लोकांना अशा आंदोलनजीवींचा अनुभव येत असेल.
11:26 February 08
चला सुधारणांसाठी एकत्र येऊया
- आपण आंदोलकांना समजावू आणि कृषी सुधारणांसाठी सर्व जण एकत्र येऊ असे आवाहन पंतप्रधानांनी विरोधकांना केले.
- चांगले झाले तर त्याचे श्रेय तुमचे, वाईट झाले तर त्याचे श्रेय माझे असे म्हणत विरोधकांना सहकार्याचे आवाहन मोदींनी केले.
- मंडी व्यवस्था अधिक व्यापक आणि मजबूत होईल याकडे लक्ष देण्याचे आश्वासन मी देतो.
- एमएसपी होता, आहे आणि राहणार असे आश्वासन मी देतो.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दुसऱ्या उपायांवरही लक्ष दिले पाहिजे.
- कृषीवरील अवलंबित्व कमी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
- आपण उशीर केला, तर आपण शेतकऱ्यांना अंधःकारात लोटण्याचे भागीदार असू.
- काही लोक पंजाबच्या शेतकऱ्यांच्या मनात चूकीच्या बाबी पेरत आहेत.
- हा देश शीख बांधवांविषयी अभिमान बाळगतो.
- पंजाबी बांधवांची दिशाभूल केली जात आहे.
11:24 February 08
हरीत क्रांतीच्या वेळेसही अशा प्रकारे अनेक विरोध झाले.
- एवढा मोठा देश आहे, तर काही मुद्द्यांवर मतभेद असणारच.
- हरीत क्रांतीच्या वेळेसही अशा प्रकारे अनेक विरोध झाले.
- तेव्हा कृषी मंत्री पद घेण्यासही कुणी तयार नव्हते.
- लाल बहादूर शास्त्री यांना सी सुब्रह्मण्यम यांना कृषी मंत्री बनवावे लागले.
- देशाच्या भल्यासाठी तेव्हा शास्त्रीजींनी यासाठी पुढाकार घेतला.
- डाव्यांनीही तेव्हा शास्त्रीजींना अमेरिकेचे एजंट संबोधले होते.
- कृषी सुधारणा शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी असल्याचा आरोप तेव्हा झाला होता.
- विक्रमी उत्पादन असतानाही कृषीमध्ये अनेक समस्या आहेत.
- दूग्ध उत्पादनाचे देशाच्या कृषी उत्पादनात 28 टक्क्यांचे योगदान आहे.
11:15 February 08
शेतकरी आंदोलनावरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे मत मांडले
- सगळे आंदोलनावर बोलले, मात्र आंदोलन कशाविषयी आहे याविषयी कुणी नाही बोलले
- माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी या चर्चेला गांभीर्याने घेतले आणि योग्य सूचना केल्या. मी त्यांचे आभार मानतो.
- कमी जमीन असल्याने छोट्या शेतकऱ्यांची स्थिती कधीही सुधारणार नाही असे चौधरी चरण सिंह यांना वाटत होते. छोट्या शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीविषयी त्यांना नेहमी दुःख व्हायचे.
- 1 हेक्टरपेक्षाही कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 51 टक्के होती. आज हे प्रमाण 68 टक्के आहे. तर 86 टक्के शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. अशा शेतकऱ्यांची संख्या 12 कोटी इतकी आहे.
- या शेतकऱ्यांना आपल्या योजनेच्या केंद्रस्थानी ठेवावे लागेल.
- हा प्रश्न चौधरी चरण सिंह यांनी आपल्यासमोर ठेवला होता. याचे समाधान आपल्याला काढावे लागेल.
- छोट्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नाही. आधीच्या पिक विमा योजनेचाही छोट्या शेतकऱ्यांना फायदा होत नव्हता. छोट्या शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधाही मिळत नव्हत्या. युरिया मिळविण्यासाठीही छोट्या शेतकऱ्यांना मोठे कष्ट घ्यावे लागत होते.
- 2014 नंतर आम्ही पिक विमा योजनेची व्याप्ती वाढविली. यामाध्यमातून 90 हजार कोटींचा लाभ शेतकऱ्यांना झाला. किसान क्रेडीट कार्ड योजनेचीही व्याप्ती वाढविली. पावणेदोन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.
- किसान सन्मान निधीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली. 1 लाख 15 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात गेले. बंगालचे शेतकरी राजकारणामुळे या योजनेपासून वंचित राहिले.
- निम कोटेड युरियामुळेही छोट्या शेतकऱ्यांना लाभ झाला. छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजनाही आणली.
- छोट्या शेतकऱ्यांसाठी आम्ही किसान रेल्वेची संकल्पना मांडली. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विकण्यासाठी मोठा फायदा झाला. किसान उडान योजनेचाही शेतकऱ्यांना फायदा झाला.
- सर्व सरकारांनी कृषी सुधारणांची शिफारस केली आहे. शरद पवार यांनीही ते सुधारणेच्या बाजूने असल्याचे सांगितलेोहोते.
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या विधानाचा दाखला दिला. मनमोहन सिंह यांनी शेतकऱ्यांना उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य तसेच देशात एकच बाजार व्यवस्था उभारण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
- त्यांनी जे मनोदय व्यक्त केले होते तेच काम आम्ही केले आहे.
- कायद्यांविषयी कुणी बोलत नाही. कायदे घाई-गडबडीत मंजूर केले यालाच सर्वांचा विरोध आहे. लग्नातही जवळचे लोक बोलावले नाही म्हणून नाराज होतात. हे असेच असते.
10:38 February 08
जाणुन घ्या राज्यसभेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
नवी दिल्ली : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले.
- राष्ट्रपतींच्या भाषणाची ताकद इतकी मोठी होती की, न ऐकताही त्यांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचले असे मोदी आपल्या भाषणाच्या सुरूवातीला म्हणाले.
- संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे असल्याचे मोदी म्हणाले.
- कवितेतून आत्मनिर्भर भारत योजनेचे कौतुक केले.
- 'अरे भारत आत्मनिर्भरता के पथ पर दौड' असे म्हणत त्यांनी या योजनेचे कौतुक केले.
- कोरोनामुळे भारताविषयी जगभरातून वेगवेगळ्या शंका व्यक्त करण्यात आल्या.
- भारताला कोरोना संकट हाताळण्यात अपयश आले तर काय होईल असे प्रत्येकाला वाटत होते.
- मात्र भारताने यशस्वीपणे हे संकट हाताळले असे मोदी म्हणाले.
- देशाचे सामर्थ्य तोडणाऱया बाबींमध्ये गुंतू नये.
- राज्यांनीही कोरोना संकटात चांगले काम केले.
- भारताची लोकशाही ही मानवी संस्था आहे, पाश्चात्य संस्था नव्हे.
- प्राचीन भारतात 81 गणतंत्रांचे वर्णन आहे.
- लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्याविषयी नागरिकांना सतर्क करणे गरजेचे आहे
- भारताचा राष्ट्रवादी स्वार्थी, आक्रमक नाही तर, सत्यम, शिवम, सुंदरमच्या मूल्यांनी प्रेरीत आहे.
- भारत ही सर्वात मोठी लोकशाही नसून भारत ही लोकशाहीची जननी आहे.
- हे आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना शिकवावे लागेल.
- भारताचे मन, परंपरा सर्व काही लोकशाही आधारीत आहे.
- आणीबाणीच्या काळाचा उल्लेख करत लोकशाहीची ताकद मोठी असल्याचे मोदी म्हणाले.
- निराशा असूनही जगातून भारताकडे आशेने बघितले जात आहे. भारत दुहेरी आकड्यातील विकासदर गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे असे मोदी म्हणाले.
- भारताकडील परकीय गंगाजळी विक्रमी पातळीवर आहे.
- अन्नधान्याचा साठाही विक्रमी पातळीवर आहे.
- इंटरनेट वापराच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- अपारंपरीक ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत भारत जगात पहिल्या पाच देशांमध्ये आहे.
- भारताचे संरक्षण सामर्थ्य वाढल्याचेही मोदी म्हणाले.
- माझे सरकार गरीबांना समर्पित असल्याचे मी 2014 मध्ये सर्वप्रथम इथे आल्यावर म्हणालो होतो.
- आजही माझे सरकार गरीबांना समर्पित आहे.