शिमला(किन्नौर) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून शासन, प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस रात्रंदिवस काम करत आहेत. कोरोनाच्या लढ्यात अनेक नागरिकही आपापल्यापरीने सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथील एका विद्यार्थ्यांने आपल्या शिक्षणासाठी जमा केलेले एक लाख रुपये कोरोना निधीसाठी दिले.
हर्षित नेगी असे नाव असलेला हा विद्यार्थी किन्नौर जवळच्या डुन्नी या खेड्यात राहतो. सगळे जग कोरोनाविरोधात लढत आहे. डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करुन करोनाबाधितांवर उपचार करत आहेत. त्यांना मानसिक आधार म्हणून मी माझ्याकडील एक लाख रुपये मुख्यमंत्री मदत निधीला दिले, अशी प्रतिक्रिया हर्षितने दिली. ज्यांना शक्य असेल त्यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी मदत करा, असे आवाहनही त्याने केले.