नवी दिल्ली - केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मंगळवारी 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान शेतीविषयक कामकाज सुलभ करण्याच्या उपायांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे आयोजन केले होते. शेतकर्यांनी आणि शेती व संबंधित क्षेत्रात गुंतलेले कामगारांना कोणत्याही अडचणींचा सामना न करता कार्य करण्यासाठी सरकारने प्रत्येक पाऊल उचलले आहे, असे तोमर यांनी यावेळी सांगितले.
लॉकडाऊन दरम्यान कृषी क्षेत्राला काही प्रमाणात सूट दिली जाईल आणि त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे परीक्षण केले जाईल, असे तोमर यांनी सांगितले.
- बैठकीमधील महत्वाचे निर्णय -
- शेतकरी त्यांच्या शेताजवळील शेतमाल विकू शकतील.
- राज्यात व आंतरराज्यमध्ये कोणत्याही अडचणीविना शेतीमालाची वाहतूक केली जाईल.
- शेतीमाल घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या वाहतूकीस सूट देण्यात आली आहे.
- कृषी क्षेत्रातील गुंतवणूकीची साधने व यंत्रसामग्रीच्या दुकानांनाही लॉकडाऊनमधून सूट मिळणार आहे.
- अवजड वाहनांना मदत देणाऱ्या दुरुस्ती केंद्रानांही सूट मळेल.
- ई-एनएएम (E-NAM), कृषी वस्तूंचा ऑनलाईन व्यापार सुरू करण्यात आला आहे.