अमरावती - आंध्र प्रदेशच्या अमरावतीमधील काही शेतकऱ्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया मरणाची परवानगी मागितली. मंगळवारी एका पत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ही मागणी केली.
वाय एस जगनमोहन रेड्डी सरकारने राज्याची राजधानी अमरावती न करता दुसऱ्या जागी नेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अमरावतीच्या नागरिकांवर अन्याय होत आहे, असे नावुलुरू गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - पाकने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर भारताकडे 'स्ट्राईक' अधिकार'
आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीहून दुसरीकडे नेण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करावा किंवा आम्हाला दया मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.