भोपाळ- कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी लोक सोशल डिस्टंन्सिंगचे पालन वेगवेवळ्या प्रकारे करत आहेत. भोपाळमधील शेतकऱ्याने त्याच्या शेतातील झाडावर माळा बनवला आहे. इथे राहून तो सोशल डिस्टंन्सि्ंगचा संदेश देत आहे.
दिवसभर झाडावर थांबणे हा सोशल डिस्टंन्सिंगचा चांगला मार्ग आहे. मी पूर्ण दिवस झाडावर थांबतो, पूर्वीच्या काळी लोक अशाच प्रकारे राहायचे हे लक्षात घेऊन मी दिवसभर धार्मिक पुस्तकांचे वाचन करतो, असे शेतकऱ्याने सांगितले.
दरम्यान, मध्य प्रदेशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 580 वर पोहोचली आहे. 24 तासात 14 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.