भोपाळ - कोरोना व्हायरसपासून बचाव व्हावा यासाठी एका शेतकऱ्याने झाडावर राहणे पसंत केल. शेतकरी मुकुल त्यांच्या फार्म हाऊस मधील एका झाडावर घर तयार करुन राहत आहेत. ते म्हणालेस, सामाजिक अंतर ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. ते त्यांचा पूर्ण दिवस या झाडावरच घालवतात.
शेतकऱ्याने सांगितले की, या पूर्वीही लोक असे राहत होते. ज्यावेळी प्लेगचा रोग पसरला होता. त्यावेळी लोक जंगलात जावून राहत होते. यामुळे मुकुल यांनी ही कल्पना सुचली आणि ते झाडावर राहू लागले. झाडावर ते दिवसभर विविध धार्मिक पुस्तक वाचत आपला वेळ घालवतात.
हेही वाचा - 'गुगल'ने 'डुडल'द्वारे मानले आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार