ETV Bharat / bharat

सिंघू बॉर्डरवर कार-ट्रकचा अपघात; कृषी आंदोलनात सहभागी शेतकऱ्याचा मृत्यू - सिंघू बॉर्डर शेतकरी आंदोलन

सोनीपत दिल्ली सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन जवळपास 7 किलोमीटर लांब आहे. यातच शुक्रवारी रात्री सिंघू बॉर्डरवर कार आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये अंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

सिंघू बॉर्डरवर कार-ट्रकचा अपघात
सिंघू बॉर्डरवर कार-ट्रकचा अपघात
author img

By

Published : Dec 5, 2020, 3:37 PM IST

सोनीपत - सिंघू बॉर्डरवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरू आहे. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला असून कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. यातच सिंघू बॉर्डरवर कार आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर कार चालकाचाही मृत्यू झाला आहे.

सोनीपत दिल्ली सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन जवळपास 7 किलोमीटर लांब आहे. यातच रात्री वेगाने येत असलेल्या एका कारने ट्रकला जोरदार टक्कर दिल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकमध्ये झोपलेल्या शेतकऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला. सुरेंद्र काला असे मृत शेतकऱ्यांचे नाव असून ते पंजाबमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेनंतर कुंडली पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट -

नवे कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज (शनिवार) 10 वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा सरकार आणि शेतकरी यांच्यात बैठक होणार आहे. सरकार आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात होत असलेली ही पाचवी बैठक आहे. या बैठकीला केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर, पियुष गोयल आणि राज्यमंत्री सोमप्रकाश उपस्थित असणार आहेत. नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांसाठी मारक असून ते रद्द केले जावेत, ही शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली भूमिका अजून कठोर केली असून ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.

हेही वाचा - सरकार शेतकऱ्यांचे ऐकणार का? आजच्या पाचव्या फेरीच्या बैठकीला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.