तंजावर (तामिळनाडू) - भारतीय संगीतातील एक प्राचीन व प्रमुख तंतुवाद्य. प्राचीन काळी वीणा हे नाव साधारणतः अवनध्द वाद्ये आणि घनवाद्ये वगळता, इतर प्रकारांना उद्देशून वापरले जात असावे. अलीकडे मात्र वीणा ही संज्ञा सामान्यतः दांड्यावर स्वरांचे पडदे असलेल्या तंतुवाद्याला अनुलक्षून वापरली जाते. वीणेचा विकास दक्षिण भारतात झाला. तंजावर (तंजोर) येथे कर्नाटकी पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा उदय झाला.
आपल्या देशातील अनेक संगीतकार दुसऱ्या राज्यात तयार केलेली वीणा घेण्याऐवजी तंजावर वीणा घेण्याचा सल्ला देतात. यासाठी वापरले जाणारे लाकूड हे तंजावर सरस्वती वीणेला आणखी खास बनवते. या कामासाठी पनरुतीतीच्या प्रसिद्ध फणसाच्या झाडांचे लाकूड वापरले जाते. तंजावर वीणा बनवणारे कलाकार आपल्या कलात्मकतेची अद्भूत शैली आणि किरकोळ गोष्टींवर विशेष लक्ष देतात. तीन भागात तयार होणाऱ्या विणेला हातांनी विशेष आकार देऊन बनवले जाते. यातील पहिला भाग म्हणजे पॉट ज्यात लाकडाच्या तुकड्याला आकार दिला जातो. दुसरा भाग म्हणजे धांडणी किंवा नळी आणि तिसरा भाग म्हणजे याझी चेहरा असतो.
या भव्य आणि नक्षीदार कोरीव कामाच जीवंत स्वरुप ५२ इंच लांब आणि ८ किलो वजनी वीणेच्या रुपात आपल्याला पाहायला मिळते. वीणेच्या पॉटवर असलेल्या नळीच्या वरच्या भागातील 24 ब्रास फ्रेट्समधून निघणारा ध्वनी छिद्राद्वारे संगीताच्या रुपात बाहेर पडतो. मात्र, यातून निघणारे स्वर जर आपोआप बदलत असतील तर ब्रास फेट्समधल्या खाली भागात गडबड असल्याचे लक्षात येते. वीणा आणि तिचे संगीत याला तोड नाही. मात्र, आजच्या पिढीचा या वाद्याबाबतचा उत्साह फारच कमी असल्याची खंत वीणा कामगार संघटनेचे कोषाध्यक्ष चिन्नप्पा यांनी व्यक्त केली.
कोरोनामुळे यंदा ग्राहकांची संख्या नेहमीच्या तुलनेत आणखी कमी झाल्याचे वीणा कारागिरांचे म्हणणे आहे. हे कारागीर आधुनिकतेच्या काळात त्यानुरुसार विविध डिझाइन्स तयार करत असले तरी या कठीण काळात टिकून राहण्यासाठी त्यांना आज सरकारच्या संरक्षणाची गरज आहे.