ETV Bharat / bharat

कोरोना महामारीचा मानवी हक्कांवर परिणाम; एनएचआरसीकडून तज्ज्ञ समितीची दुसरी बैठक - राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 'मानवी हक्क आणि भविष्यावर कोरोना महामारीचा परिणाम' यावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक घेतली.

 एनएचआरसी
एनएचआरसी
author img

By

Published : Aug 1, 2020, 12:20 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. यातच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने 'मानवी हक्क आणि भविष्यावर कोरोना महामारीचा परिणाम' यावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ गटाची दुसरी बैठक घेतली.

जुलै महिन्यात कोरोनाचा मानवी हक्कांवर झालेल्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एनएचआरसीने 11 सदस्य तज्ज्ञ समिती गठीत केली. ही तज्ज्ञ समिती लोकांच्या मानवी हक्कांवर, विशेषत: समाजातील उपेक्षित आणि असुरक्षित घटकांवर झालेल्या कोरोनाच्या परिणामाचे परीक्षण करण्याचे काम करीत आहे. ही समिती केंद्र आणि राज्य सरकारांना आवश्यक सल्लाही देऊ शकते.

ही तज्ज्ञ समिती सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून महामारी दरम्यान उद्भवलेल्या स्थलांतरित संकटाचा आणि विविध राज्यांत हातळलेल्या परिस्थितीचा अभ्यास करीत आहे. औरैया येथे एकाच वाहनातून मृत आणि जखमी प्रवासी मजुरांना नेल्याच्या घटनेवरून एनएचआरसीने उत्तर प्रदेश सरकारला नोटीस बजावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.