नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती आर्मी रिसर्च अँड रेफर्रल हॉस्पीटलने दिली आहे.
सैन्यदलाच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले, की प्रणव मुखर्जी यांचे महत्त्वाचे अवयव हे व्यवस्थित सुरू आहेत. तसेच इतर वैद्यकीय निकष हे स्थिर असल्याचे दिसून आले आहे. त्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत.
माजी राष्ट्रपती मुखर्जी यांना दिल्लीमधील कॅँटोनमेंटमधील रुग्णालयात 10 ऑगस्टला दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूतील गाठ ही शस्त्रक्रिया करून काढण्यात आली आहे. 84 वर्षी प्रणव मुखर्जी हे कोमात गेल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. मुखर्जी यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाली आहे. मुखर्जी यांनी देशाचे 13 वे राष्ट्रपती म्हणून 2012 ते 2017 मध्ये कार्यभार सांभाळला आहे.