हैदराबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन या दोघांमध्ये ऑनलाइन शिखर परिषद पार पडली. यामध्ये आरोग्य सेवा, व्यापार आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंधाना आणखी व्यापक आणि मजबूत करण्यावर चर्चा झाली. तर राज्यात आज मुंबईत गुरुवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. तसेच तेलंगणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेल्या दोन वाहनांमध्ये दोन कोटी वीस लाखांची रक्कम आढळली आहे. ही रक्कम नक्षलवाद्यांना पोहोचविण्यासाठी भामरागडला नेण्यात येत होती, असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आली, तर नाशकात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका पुण्यातील ग्रामीण भागाला देखील बसला असून केळी, आंब्याच्या बागा भूईसपाट झाल्या आहेत. तसेच केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी अभिनेत्री श्रद्धा कपूरने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यामध्ये ऑनलाइन शिखर परिषद पार पडली. यामध्ये आरोग्य सेवा, व्यापार आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंधाना आणखी व्यापक आणि मजबूत करण्यावर चर्चा झाली. यावेळी बोलताना, भारत ऑस्ट्रेलिया संबंध दृढ करण्याची ही 'योग्य वेळ आणि योग्य संधी' असल्याचा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
वाचा सविस्तर - नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांची 'ऑनलाईन शिखर परिषद'; भारत-ऑस्ट्रेलिया संबंध सुदृढ करणार
मुंबई - आज गुरुवारी सकाळपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे. निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला असला तरी मुंबईमध्ये रेड अलर्ट अजूनही कायम आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. किंग्स सर्कल या सखल भागात गुडघाभर पाणी साचले आहे. मात्र, याचा वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
वाचा सविस्तर - मुंबईत पावसाची दमदार हजेरी, सखल भागात साचले पाणी
गडचिरोली - तेलंगाणा राज्यातून महाराष्ट्राच्या सीमेलगत आलेल्या दोन वाहनांमध्ये दोन कोटी वीस लाखांची रक्कम आढळली आहे. ही रक्कम नक्षलवाद्यांना पोहोचविण्यासाठी भामरागडला नेण्यात येत होती, असे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. सिरोंचा पोलिसांनी या प्रकरणी तेलंगाणाच्या आणखी दोन बड्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाचा सविस्तर - नक्षलवाद्यांना निधी पुरविल्याप्रकरणी तेलंगणाच्या दोन बड्या कंत्राटदारांसह चौघांवर गुन्हा
नाशिक- जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला या मोसमातील पहिला पूर आल्याचे पाहायला मिळाले. गोदावरी नदीच्या या पुरामुळे शहरातील नदी काठचे रामकुंड, लक्ष्मणकुंड पाण्याखाली गेले आहेत. तसेच गांधी तलावही ओसंडून वाहू लागला आहे.
वाचा सविस्तर - नाशकात गोदावरीला पूर; राम-लक्ष्मण कुंड पाण्याखाली, गांधी तलाव ओव्हर फ्लो
नाशिक - अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने बुधवारी दुपारी आलिबागजवळ धडकले. साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास वादळाने किनारा ओलांडून राज्यात प्रवेश केला. त्यानंतर मात्र पुढील सहा तासांमध्ये त्याची तीव्रता खूप कमी झाली. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी वादळामुळे झाडे कोसळली. या वादळाचा तडाखा नाशिक जिल्ह्यालाही बसला. मनमाड, येवल्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात, जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेड, पोल्ट्री, फार्म, घरे उद्ध्वस्त झाली. तर झाडे देखील कोलमडून पडली. यामुळे रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाचा सविस्तर - नाशिक जिल्ह्याला बसला 'निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा, मालमत्तेचे मोठे नुकसान
पुणे - जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यात चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून केळी, आंबा बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेली फळे भुईसपाट झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाचा सविस्तर - निसर्ग चक्रीवादळाचा फळबागांना तडाखा; जुन्नरचा आंबा, केळी बागा भुईसपाट
रायपूर - पतीला नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत आयएएस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन जांजगीर चांपा जिल्ह्याचे पूर्व जिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्यावर बलात्कारासह, अश्लिल मॅसेज पाठवणे, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
वाचा सविस्तर - पतीला नोकरीतून काढण्याची धमकी देत आयएएस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप; गुन्हा दाखल
नवी दिल्ली - शहरातील एनसीआर परिसरात रात्री साडेदहाच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता ३.२ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र दक्षिण पूर्व नोएडात नोंदवण्यात आले.
वाचा सविस्तर - दिल्लीला भूकंपाचे धक्के; दीड महिन्यात तब्बल ११ वेळा हादरली दिल्ली
कोलंबो - श्रीलंकेचे तीन क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये अडकल्याचा धक्कादायक माहिती श्रीलंकेच्या क्रीडामंत्र्यांनी दिली आहे. यामुळे श्रीलंकन क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. लवकरच आयसीसी
वाचा सविस्तर - श्रीलंकेच्या तीन क्रिकेटपटूंवर मॅच फिक्सिंगचे आरोप, लंकन क्रीडामंत्र्यांची माहिती