- मुंबई - खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २ हजार २०० व २ हजार ८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र, प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २ हजार ८०० रुपये न आकारता त्यांच्याकडून २ हजार ५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) येथे दिली. मुंबईमध्ये आठवडाभरात ६५० रुग्णवाहिकांची सेवा उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सविस्तर वाचा : 'प्रयोगशाळेत स्वत:हून तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० ऐवजी २५०० रुपये आकारण्याचा निर्णय'
- मुंबई - शालेय शिक्षण विभागाने राज्यभरात ऑनलाईन आणि डिजिटल शिक्षणाचा मोठा गाजावाजा करत दोन दिवसांपूर्वी त्यासाठीची सुरूवातकेली आहे. अशात आता राज्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेनुसार ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षणाचा मोठा बोजवारा उडू शकतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात केवळ 61 टक्के विद्यार्थ्यांना व्हाट्सअॅपद्वारे संपर्क होऊ शकतो. तर, उर्वरित 39 टक्के विद्यार्थी हे व्हॉट्सअॅपच्या संपर्काबाहेर आहेत. राज्यात ज्यांच्याकडे मोबाईलच नाही अशांची संख्या ही तब्बल 31. 76 टक्के इतकी आहे.
सविस्तर वाचा : धक्कादायक: राज्यात 35 टक्के विद्यार्थ्यांकडे टीव्ही, तर 31 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईलच नाहीत
- नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मंगळवारी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज बुधवारी पुन्हा चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वाचा : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना कोरोनाची लागण
- मुंबई - महाराष्ट्राने 'मिशन बिगिन अगेन'मधून कशी झेप घेतली? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबतच्या औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी, शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावे, परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र हवे, अशा काही मागण्या केल्या.
सविस्तर वाचा : मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांसोबत बैठक, 'हे' मुद्दे केले उपस्थित
- मुंबई - राज्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांना बेड्सची कमतरता पडत आहे. ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, असे रुग्णही रिपोर्ट घेऊन खासगी रुग्णालयात भरती होत असल्याने गरजू रुग्णांना खाटा मिळत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणतीही लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला खासगी रुग्णालयाने भरती करुन घेऊ नये, अशा सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या हितासाठीच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.
सविस्तर वाचा : 'कोरोनाची लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांनी भरती करु नये'
- जयपूर - येत्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपमध्ये आमदारांच्या घोडेबाजारांसंबधी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अशाच एका आरोपाला प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले, की विरोधी पक्षातील आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा विचार आम्ही करत नाही. जर आम्हाला तसे करायचे असते, तर केवळ ३५ कोटींमध्ये आम्ही संपूर्ण काँग्रेस पक्षाला विकत घेतले असते, असेही ते म्हणाले.
सविस्तर वाचा : आम्ही ३५ कोटींमध्ये पूर्ण काँग्रेसला विकत घेतले असते; राजस्थान भाजप प्रदेशाध्यक्षांचा दावा..
- बीजिंग - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सोमवारी रात्री झटापट झाली. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले. तसेच चीनची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. यावर गलवान प्रदेशाचे सार्वभौमत्व नेहमीच चीनशी संबंधित आहे. भारतीय सीमा-दलाच्या सैन्याने सीमेशी संबंधित मुद्द्यांवरील प्रोटोकॉलचे उल्लंघन केले असून भारताने आपल्या सैन्यांना आवारावं, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियन यांनी म्हटलं आहे.
सविस्तर वाचा : ''गलवान' व्हॅली आमचीच... भारताने आपल्या सैन्याला आवर घालावा'
- नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव, आणि सोमवारी रात्री दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. शुक्रवारी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून ती व्हर्चुअली बोलावण्यात आली आहे.
सविस्तर वाचा : भारत-चीन सैन्य झटापट : पंतप्रधान शुक्रवारी घेणार सर्वपक्षीय बैठक...
- मुंबई - सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, आदित्य चोप्रा यांच्यासह आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बिहारमधील मुजफ्फरनगरमध्ये ही तक्रार केली गेली. या आठ जणांनी संगनमत करून सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलेला आहे. बिहारमधील पेशाने वकील असलेल्या सुरज कुमार ओझा यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वाचा : सुशांत आत्महत्या प्रकरण: करण जोहर, सलमानसह आठ जणांविरोधात तक्रार दाखल
- लंडन - कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर गुणकारी ठरणाऱ्या डेक्सामेथासॉन या स्टेरॉईडच्या वापरासाठी बुधवारी परवानगी देण्यात आली. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्विसला ही परवानगी देण्यात आली आहे. या स्टेरॉईड कोरोनाच्या गंभीर रुग्णांमधील मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करते.
सविस्तर वाचा : कोविड-१९ : रुग्णांवर 'डेक्सामेथासॉन'च्या वापराला ब्रिटनने दिली परवानगी..