ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...

एकाच क्लिकवर वाचा राज्यातील, देशातील आणि जगभरातील रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्वाच्या दहा बातम्या...

etv bharat top 10 news at 11 pm
ईटीव्ही भारत रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Jun 29, 2020, 11:04 AM IST

Updated : Jun 29, 2020, 10:56 PM IST

हैदराबाद - राज्यातआज (सोमवार) दिवसभरात 5257 नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे... टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अ‌ॅपवर भारत सरकारने बंदी घातली आहे... जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे... औरंगाबाद जिल्ह्यात हॉट स्पॉट ठरलेल्या वाळूज परिसरात दिनांक 4 ते 12 जुलै या काळात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे... राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आले आहे... यासह वाचा राज्यातील, देशातील आणि जगभरातील महत्वाच्या घडामोडी...

  • नवी दिल्ली - टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अ‌ॅपवर भारत सरकारने बंदी घातली आहे. आयटी अ‌ॅक्ट 2000 अंतर्गत भारतात 59 चिनी अ‌ॅप्स बॅन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यात टिक-टॉक, पबजी, यूसी ब्राऊजर, हैलो, शेअर इट, वी चॅट, यू व्हिडीओ, ब्युटी प्लस, लाईक या अ‌ॅप्सचा समावेश आहे.

सविस्त वाचा - CORONA UPDATE : राज्यात 5,257 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, एका दिवसात १८१ मृत्यू

  • मुंबई - आज (सोमवार) राज्यात दिवसभरात 5257 नवीन कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. तर, दिवसभरात 181 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढच होताना दिसत आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1,69,883 वर पोहचला आहे. यातील 73, 298 रुग्ण हे अ‌ॅक्टिव्ह आहेत.

वाचा सविस्तर - भारत सरकारकडून टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अ‌ॅपवर बंदी

  • हैदराबाद : भारतातील कोरोनाचे पहिली लस तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे. 'कोव्हॅक्सिन' असे या औषधाचे नाव आहे. भारत बायोटेक, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयएमसीआर), आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांनी संयुक्तपणे या लसीचे संशोधन केले आहे. सार्स-कोव्ह-२ या विषाणूचा नमुना एनआयव्हीमधून भारत बायोटेकमध्ये आणण्यात आला होता, त्यानंतर त्यावर संशोधन करुन ही लस तयार करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - कोरोनावरील पहिली भारतीय लस तयार; 'कोव्हॅक्सिन'ची मानवी चाचणी होणार जुलैमध्ये..

  • औरंगाबाद - जिल्ह्यात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहून प्रशासनाने आता काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात हॉट स्पॉट ठरलेल्या वाळूज परिसरात दिनांक 4 ते 12 जुलै या काळात संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर लवकरच अधिक कडक निर्णय घ्यावे लागतील, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा - वाळूज एमआयडीसीत 8 दिवस संचारबंदी; औरंगाबादकरांनाही 'लॉकडाऊन'चा इशारा

  • मुंबई - कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात आलेल्या शव बॅगेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यावेळी पत्रकार परिषदेत संदीप देशपांडे यांनी पेंग्विन गॅंग असा उल्लेख करत युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर संदीप देशपांडे यांना वरुण सरदेसाई यांनी कायदेशीर मानहानीची नोटीस बजावली आहे. तर या वादात आता मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी उडी घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसे विरुद्ध युवासेना हा वाद पाहायला मिळणार आहे.

सविस्तर वाचा - मनसे-युवासेना वाद रंगणार, वरुण देसाईंनी बजावली संदीप देशपांडेना मानहानीची नोटीस

  • वाशिम - कष्ट करण्याची उमेद व जिद्द वयासह कुठल्याही अडचणींवर सहज मात करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण वाशिम जिल्ह्यातील तांदळी शेवई येथे पाहावयास मिळाले. आर्थिक चणचणीमुळे बैल विकत घेण्याची परिस्थिती नसल्याने एका ६८ वर्षीय शेतकऱ्याने वयोवृद्ध पत्नीच्या सहाय्याने आपल्या शेतात डवरणीला सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा - बैलजोडी नसल्याने शेतकऱ्याने डवरणीला जुंपले पत्नीला

  • पुणे - जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बीण प्रकल्प असलेल्या जुन्नरच्या खोडद येथील जीएमआरटीच्या मदतीने पुण्यातील एनसीआरएच्या शास्त्रज्ञानी दुर्मिळ मृत आकाशगंगेचा शोध लावला आहे. या आकाशगंगेच्या अवशेषांमधून रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. या संदर्भातले संशोधन राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकशास्त्र केंद्राच्या(एनसीआरए) डॉ.सी.एच ईश्वरचंद्रा आणि आफ्रिकेतील डॉ. झारा आर यांनी केले आहे. ते नुकतेच प्रकाशित झालेल्या 'आर्काईव्ह' या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. 'जे 1615+5452' असं या आकाशगंगेच नाव आहे.

सविस्तर वाचा - पुण्यातील शास्त्रज्ञांनी लावला मृत आकाशगंगेचा शोध; अंतराळ संशोधनातील मोठी घटना

  • जळगाव - जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. सर्वच क्षेत्रावर कोरोनामुळे विपरीत परिणाम झाला आहे. असे असताना सट्टा बाजार मात्र कोरोनामुळे तग धरून उभा आहे. दरवर्षी मार्च ते जून महिन्यादरम्यान आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जातो. परंतु, यावर्षी कोरोनामुळे सर्वच क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्या, निवडणुकांचाही मोसम नाही. अशा परिस्थितीत सट्टा बाजार चालवणाऱ्यांनी नवा 'फंडा' शोधून काढला आहे. सध्या दररोज समोर येणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीवर सट्टा खेळला जात आहे. जळगाव जिल्ह्यात देखील या माध्यमातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. बुकींनी खासगी चर्चेमध्ये हा गौप्यस्फोट केला आहे.

सविस्तर वाचा - क्रिकेटनंतर आता कोरोना सट्टा बाजाराच्या पथ्थ्यावर; रुग्णांच्या आकडेवारीवर लागतोय लाखोंचा सट्टा!

  • मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. तसेच दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारने लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आले आहे. अनलॉक-१ प्रमाणेच अनलॉक-२ मध्येही काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा - मिशन बिगीन अगेन २.० : राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊ

  • भंडारा - शहरात एका तरुणाचा निर्घूणपणे गळा चिरुन खून केल्याने खळबळ उडाली. सूरज यादव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भरदिवसा गजबजलेल्या शुक्रवारी वार्डमध्ये हा खून झाल्याने दहशत पसरली आहे. मागील दहा दिवसांमध्ये शहरात दुसऱ्यांदा हत्याकांड घडले आहे. हत्येनंतर मारेकरी फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.

सविस्तर वाचा - भंडाऱ्यात पुन्हा एका तरुणाचा गळा चिरुन खून; दहा दिवसातील दुसऱ्या हत्याकांडाने परिसरात दहशत

Last Updated : Jun 29, 2020, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.