ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

वाचा राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या दहा घडामोडी एकाच क्लिकवर...

etv bharat top 10 news at 11 pm
ईटीव्ही भारत रात्री अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Jul 16, 2020, 8:58 AM IST

Updated : Jul 16, 2020, 10:57 PM IST

हैदराबाद - राज्यात आज (गुरुवार) कोरोनाच्या ८ हजार ६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले, तर मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण आढळून आले... सीएसएमटी येथील जीपीओ जवळील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग आज (गुरुवार) सायंकाळी कोसळला... एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे... राजस्थान उच्च न्यायालयाने सचिन पायलट यांच्या याचिकेवरील सुनावणी स्थगित केली आहे...मुंबईमध्ये काम करूनही पगार मिळत नसल्याने केरळचे 40 डॉक्टर माघारी निघाले आहेत... यासह वाचा राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी...

  • मुंबई - दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. अशातच आज एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात आज (शुक्रवार) कोरोनाचा उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. आज ५ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६३ टक्के असून, आतापर्यत एकूण संख्या १ लाख ५८ हजार १४० रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, आज कोरोनाच्या ८ हजार ६४१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा - दिलासादायक! कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रुग्णांची संख्या अधिक...

  • मुंबई - सीएसएमटी येथील जीपीओ जवळील भानुशाली इमारतीचा अर्धा भाग आज (गुरुवार) सायंकाळी पत्त्यासारखा कोसळला. या इमारतीचा मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत 2 जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल मलाबा हटवत असून त्यात कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

सविस्तर वाचा - मुंबईतील सीएसएमटीजवळील इमारतीचा भाग कोसळला, ढिगाऱ्यातून दोघांची सुटका; बचावकार्य सुरु

  • मुंबई - मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण आढळून आले असून, 56 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 97 हजार 751 वर; तर मृतांचा आकडा 5 हजार 520 वर पोहोचला आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर, तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवसांवर पोहोचला आहे.

सविस्तर वाचा - मुंबईत कोरोनाचे 1 हजार 498 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 97 हजार 751वर..

  • मुंबई - एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले तेलगू कवी वरवरा राव यांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तळोजा कारागृहातून उपचारांसाठी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली. मात्र, कोरोनाची कोणतीही लक्षणे त्यांच्यात दिसत नसून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जेजे रुग्णालयाचे डीन रणजित माणकेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. वरवरा राव यांना पुढील उपचारांसाठी लवकरच जिटी रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.

सविस्तर वाचा - तेलुगू कवी वरवरा राव यांना कोरोनाची लागण

  • मुंबई - राज्यात आमचे सरकार स्थिर असून, सरकारला कोणताही धोका नाही. उलट भाजपचे लोक आमच्या संपर्कात असून, ते लोक कोण आहेत, हे कळले तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होईल, असे भाकीत महिला व बालकल्याण विकासमंत्री अ‌ॅड. यशोमती ठाकूर यांनी केले. राजस्थाननंतर राज्यातील सरकारही अस्थिर होईल का, यासंदर्भात त्यांना प्रश्न उपस्थित केला असता, त्यांनी हे भाकीत केले.

सविस्तर वाचा - 'भाजपचे लोक संपर्कात, कोण आहे ते समजल्यास राजकीय भूकंप होईल'

  • जयपूर - राजस्थान उच्च न्यायालयाने सचिन पायलट यांच्या याचिकेवरील सुनावणी स्थगित केली आहे. पायलट यांनी याचिकेमध्ये सुधारणा करण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यांना हा वेळ देत उच्च न्यायालयाने सुनावणी स्थगित केली. यापुढील सुनावणी ही उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठासमोर होणार आहे.

सविस्तर वाचा - राजस्थान सत्तासंघर्ष : पायलट यांच्या याचिकेवरील सुनावणी स्थगित

  • औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.१८ टक्के लागला आहे.

सविस्तर वाचा - बारावी परीक्षा निकाल: औरंगाबाद विभागाने मिळवला शेवटून पहिली क्रमांक, 'असा' लागला निकाल

  • मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील भानुशाली या इमारतीचा काही भाग आज (गुरुवार) सायंकाळी कोसळला. सदर इमारत ही म्हाडाची होती. म्हाडाने ती खाली करून पुढील कारवाई करायला हवी होती, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी म्हटले आहे. तसेच आतापर्यंत इमारतीमधून 18 जणांना सुखरुपपणे बाहेर काढले असून दोन जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

सविस्तर वाचा - भानुशाली इमारत म्हाडाची, त्यांनी ती खाली करायला हवी होती : आयुक्त इकबाल सिंह चहल

  • नागपुर - कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने स्वतःच्या ९ महिन्यांच्या चिमुकलीचा निर्घृण खून केला, आणि त्यांनतर स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अलविना शेख असे या दुर्दैवी बाळाचे नाव आहे. तर सोनू शेख असे आरोपी बापाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - लेकीची हत्या करुन बापाचा आत्महत्येचा प्रयत्न; कौटुंबिक वादातून घडली घटना..

  • मुंबई - मुंबईतील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने केरळवरून डॉक्टर आणि नर्सची टीम मागवली. ही टीम दीड महिन्यापासून काम करत आहे. पण या टीमला मुंबई महानगर पालिकेने अजून पगारच दिला नाही. पाठपुरावा करूनही पगार मिळत नसल्याने आता निराश होऊन 40 डॉक्टरांनी केरळला परत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केरळ टीमचे प्रमुख डॉ. संतोष कुमार यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

सविस्तर वाचा - मुंबईमध्ये काम करूनही पगार मिळत नसल्याने केरळचे 40 डॉक्टर निघाले मायदेशी

Last Updated : Jul 16, 2020, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.