ETV Bharat / bharat

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - महाराष्ट्र कोरोना अपडेट

सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

etv-bharat-top-10-news-at-11-am
Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या...
author img

By

Published : Jun 16, 2020, 11:05 AM IST

मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे... जम्मू-काश्मीरच्या शोपियान तुर्कवांगम भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला... देशात मागील २४ तासांत १० हजार ६६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह आता एकूण रुग्ण संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे.... आत्महत्येची रिपोर्टिंग कशी असावी, यासह महत्वाच्या टॉप -१० बातम्या....

  • मुंबई - सरकारने सहा महिन्यांचा टप्पा पूर्ण केला आहे. सरकार तीन भिन्न विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन बनवले. त्या सरकारचे सुकाणू एकमताने उद्धव ठाकरे यांच्या हाती दिले. राज्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांचाच निर्णय अंतिम राहील हे एकदा ठरल्यावर कोणताही प्रश्न उद्भवत नाही. स्वत: शरद पवार यांनी हे पथ्य पाळले आहे. ते मुख्यमंत्र्यांना अधूनमधून भेटत असतात. त्यांचा अनुभव मोठा. त्यानुसार राज्यासंदर्भात ते काही सूचना करतात. काँग्रेस पक्षाचेही बरे सुरू आहे, पण जुनी खाट जरा अधूनमधून जास्त कुरकुरते. खाट जुनी आहे, पण या खाटेला ऐतिहासिक वारसा आहे, असे म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.

सविस्तर वाचा - खाट का कुरकुरतेय?, मंत्री चव्हाण अन थोरातांवर सामनातून 'तिरकस बाण'

  • श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान तुर्कवांगम भागात आज (मंगळवार) सकाळी, भारतीय जवान आणि दहशतवांद्यामध्ये चकमक झाली. यात भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली. ही माहिती काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा - J&K : शोपियानमध्ये चकमकीत तीन दहशतवादी ठार, गेल्या १७ दिवसात २७ जणांचा खात्मा

  • हैदरबाद - रविवारची दुपार उजाडली ती अतिशय दुर्दैवी बातमी घेऊनच. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला. मुंबईच्या पाॅश वसाहतीतल्या फ्लॅटमध्ये त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचे निश्चित झाले.

सविस्तर वाचा - आत्महत्येची रिपोर्टिंग कशी असावी; आपण लोकांना आत्महत्येसाठी उद्युक्त तर करत नाही ना?

  • नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा विळखा दिवसागणिक आणखी घट्ट होताना दिसत आहे. लॉकडाउनच्या पाचव्या टप्यात देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत १० हजार ६६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह आता एकूण रुग्ण संख्या ३ लाख ४३ हजार ९१ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांत ३८० रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९,९०० वर पोहोचली आहे.

सविस्तर वाचा - कोरोना अपडेट : २४ तासात वाढले १० हजार ६६७ नवीन रुग्ण, मोदी आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा

  • अकोला - देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राचीही झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. आता शाळेबाबतही राज्य शासन निर्णय शाळांवर ढकलून मोकळे झाले, अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला.

सविस्तर वाचा - 'सरकारची निर्णय क्षमता संपली, सरकारच्या निर्णयाचा धिक्कार'

  • मुंबई - 950 हून अधिक कोरोना मृत्यू आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता दडवण्यात आले, असा गंभीर आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतके अक्षम्य दुर्लक्ष का आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार, असा सवाल फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहून विचारला आहे.

सविस्तर वाचा - मुंबईत 950 हून अधिक कोरोना मृत्यू दडवले? देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर खळबळजनक आरोप

  • नवी दिल्ली - नागरी उड्डाण संचालनालयाने (डीजीसीए) सांगितलेल्या माहितीनुसार 'वंदे भारत' मोहिमेअंतर्गत 870 चार्टर्ड विमानांमधून 2 लाख भारतीय प्रवाशांना भारतामध्ये आणण्यात आले. लॉकडाउन काळामध्ये परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थी, पर्यटक, व्यावसायिक आणि इतरांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत' मोहिम आखली होती. या मोहिमे अंतर्गत तब्बल २ लाख भारतीय मायदेशी परतले आहेत.

सविस्तर वाचा - वंदे भारत मोहिमेअंतर्गत 870 चार्टर्ड विमानांमधून 2 लाख प्रवाशी भारतात दाखल

  • पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तळेगाव दाभाडे आगारातील बंद असलेली एसटी बस सेवा पुन्हा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात तळेगाव दाभाडे बस आगाराला साडेतीन कोटींचा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे, अशी माहिती आगार प्रमुख तुषार माने यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. दरम्यान, आजपासून प्रायोगिक तत्वावर तालुक्यात पाच एसटी बस प्रवासी वाहतूक करणार आहेत. दिवसातून तीन फेऱ्या होणार आहेत.

सविस्तर वाचा - पुण्याच्या ग्रामीण भागात पुन्हा धावणार 'लालपरी'

  • मुंबई - खेळाडूची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यास, चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेच्या उपयोगाची मुभा देण्याचा विचार आयसीसीने करायला हवा, असे मत भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याने व्यक्त केले आहे. अजित आगरकर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान, कोरोनामुळे चेंडूला चकाकी आणण्यासाठी आयसीसीने लाळेच्या वापरावर निर्बंध घातले आहेत.

सविस्तर वाचा - खेळाडू कोरोना संक्रमित नसतील तर लाळेचा उपयोग करू द्यायला हरकत नाही - आगरकर

  • मुंबई - राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक ४,२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सविस्तर वाचा - दिलासादायक.. राज्यात आज कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या विक्रमी, ५ हजार ७१ रुग्णांना सोडले घरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.