हैदराबाद - महाराष्ट्रात आज (शनिवार) ८ हजार ३४८ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत... संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल(शुक्रवार) लडाखचा दौरा करत सीमेवरील जवानांशी संवाद साधला... खासदार विनायक राऊत यांचे सुपूत्र गीतेश राऊत यांनी आपण कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे... एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांनी शनिवारी १ लाखाचा टप्पा गाठला आहे... मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी व आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला... यासह राज्यातील आणि देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा...
- मुंबई - राज्यातील काही जिल्ह्यांत टाळेबंदी घोषित केली असली तरी कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. सलग चौथ्या दिवशी आठ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली आहे. राज्यात आज ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा - सलग चौथ्या दिवशी संसर्गाचा गुणाकार; आठ हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद
- मुंबई - जिल्ह्यातील सर्व नागरिकांचा सहभाग मिळवून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करा. शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील जिल्हाधिकारी व आयुक्तांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
सविस्तर वाचा - शहरी भागातील कोरोना ग्रामीण भागात पसरू देऊ नका - मुख्यमंत्री
- नवी दिल्ली – मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वापरकर्त्यांची माहिती चोरणाऱ्या ब्लॅकरॉकच्या नव्या मालवेअरचा मेमध्ये आणखी धोका वाढला आहे. ही माहिती थ्रेटफॅबरिक या मोबाईल सुरक्षा संस्थेने शोधून काढली आहे. ब्लॅकरॉकच्या धोक्याविषयी थ्रेटफॅबरिकचे अधिकारी कर्नल इंद्रजीत यांनी माहिती दिली. ज्या अॅपमध्ये ब्लॅकरॉक मालवेअर येते, त्यामधून अँड्राईड सेवेमध्ये बदल करण्यात येतात. त्यामुळे वापरकर्त्याच्या मोबाईलमधून बनावट गुगल अपडेटला परवानगी दिली जाते.
सविस्तर वाचा - तुमच्या मोबाईलला होवू शकतो धोका; 'हे' मालवेअर चोरते माहिती
- सिंधुदुर्ग - 'माझी चूक नाही, मला बदनाम करण्यात येत आहे. मी कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जायला तयार आहे.' असे खासदार विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत यांनी म्हटले आहे. काल (शनिवार) कणकवलीत हितेश यांचा पोलीस कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर विचारणा करण्यात आली असता, गीतेश राऊत यांनी आपण कोणत्याही पोलीस चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले.
सविस्तर वाचा - 'उलट त्यांनीच शिवीगाळ केलीये.. कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार'
- मुंबई - राज्यासह देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांनी शनिवारी १ लाखाचा टप्पा गाठला आहे. तर कोरोनामुळे मुत्यू झालेल्या रुग्णांची सख्या ५ हजार ६४७ वर पोहोचली आहे. शहरात दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत आहे.
सविस्तर वाचा - चिंताजनक! एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या पार
- इम्फाळ - मनिपूर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक(कायदा-सुव्यवस्था) अरविंद कुमार यांनी आपल्या कार्यालयात बसलेले असताना स्वत:वर गोळी झाडून घेतली. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.
सविस्तर वाचा - मनिपूर : अतिरिक्त पोलीस महासंचालकांचा स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
- अयोध्या - राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टची आज(शनिवार) अयोध्येत बैठक होणार आहे. या बैठकीत मंदिरच्या बांधकामासाठी भूमीपूजनाची तारीख ठरण्याची शक्यता आहे. संस्थानाचे अनेक सदस्य अयोध्येत पोहचले आहेत. ट्रस्टचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा बैठकीसाठी बुधवारी अयोध्येत आले आहेत. बैठकीची वेळ मात्र, समजू शकली नाही.
सविस्तर वाचा - राम मंदिराच्या भूमीपूजनाची तारीख ट्रस्टच्या बैठकीत होणार निश्चित ?
- नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल(शुक्रवार) लडाखचा दौरा करत सीमेवरील जवानांशी संवाद साधला. भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी ही भेट दिली. कोणतीही सत्ता भारताच्या इंचभर जमिनीला हात लावू शकत नाही, असा इशारा सिंह यांनी चीनचे नाव न घेता दिला. मात्र, काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी संरक्षण मंत्र्यांवर टीका केली. संरक्षण मंत्र्यांची ही फक्त पोकळ शाब्दिक वल्गना असून चिनी सैनिक अजूनही भारतीय भूमीवर आहेत, असे ते म्हणाले.
सविस्तर वाचा - लडाखमधील संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे 'पोकळ वल्गना' - चिदंबरम
- मुंबई - राज्यातील पोलीस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. त्यावेळी देशमुख बोलत होते.
सविस्तर वाचा - खुशखबर.. डिसेंबरपर्यंत राज्यात पोलीस दलातील १२ हजार ५३८ पदांची भरती
- नवी मुंबई - पनवेलमधील कोन येथील विलगीकरण कक्षात असणाऱ्या 40 वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना 16 जुलैला घडली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आज याठिकाणी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि चित्रा वाघ यांनी भेट दिली. महिला अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना राज्याचे गृहमंत्री काय करतात? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. तसेच गृहमंत्री कधी जनतेची माफी मागतील? असेही ते म्हणाले.
सविस्तर वाचा - पनवेल बलात्कार प्रकरण : गृहमंत्री कधी जनतेची माफी मागणार - किरीट सोमय्या