मुंबई - लोकल सेवा सुरु झाल्यास आम्हीही आमची सेवा देऊ, असे मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले आहे... कोरोना विषाणूच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने मुलगा तैमूरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला... खरीप हंगाम सुरू झाला, तरी राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. हा कापूस कधी विकला जाईल याच्या चिंतेत सध्या शेतकरी आहे. यासह देश, विदेशासह राज्यातील महत्वाच्या बातम्या...
- मुंबई - 'मिशन बिगिन अगेन'मध्ये मुंबई काही प्रमाणात सुरू झाली आहे. कार्यालय देखील उघडण्यात आली आहेत. लोकलसेवा सुरू न झाल्यामुळे मुंबईचा डब्बेवाला कर्मचाऱ्यांना सेवा देऊ शकणार नाही. काही जवळच्या ठिकाणी आम्ही योग्य सुरक्षा घेऊन डब्बे देण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे लोकल सेवा सुरु झाल्यास आम्हीही आमची सेवा देऊ, असे मुंबई डबेवाला असोसिएशन अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
सविस्तर वाचा - लोकलसेवा सुरू झाल्यास आम्हीही सेवा देऊ - मुंबई डबेवाला असोसिएशन
- मुंबई - कोरोना विषाणूच्या भीतीने गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरीच असलेल्या सैफ अली खान व करीना कपूरने मुलगा तैमूरसोबत रविवारी मरीन ड्राइव्हवर फेरफटका मारला. ते समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्ताचा आनंद घेत असताना, पोलिसांनी त्यांना हटकले. तेव्हा त्यांना घरी परतावे लागले.
सविस्तर वाचा - सैफ-करीनाचा तैमुरसोबत मरीन ड्राइव्हवर फेरफटका; पोलिसांनी हटकले तेव्हा घेतला काढता पाय
- मुंबई - एका महिलेला प्रसव वेदना सुरु होत होत्या. मात्र तीला ताप असल्याने कोरोनाच्या भीतीमुळे पालिका किंवा खासगी रुग्णालये तिला दाखल करून घेण्यास नकार देतात. त्याचवेळी एक क्लिनिक चालवणारा डॉक्टर मदतीला धावत येतो आणि त्या महिलेची प्रसूती घरातच करतो. एखाद्या चित्रपटामधील हा प्रसंग वाटत असला तरी असाच प्रसंग देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चांदीवली येथे घडला आहे. यामुळे वेळ प्रसंगी मदतीला धावून येणाऱ्या डॉ. रविंद्र म्हस्के यांचे सर्वत्र कौतूक होत आहे
सविस्तर वाचा - मुंबई : शासकीय रुग्णालयाने दाखल करुन घेण्यास नकार दिल्याने महिलेची घरातच झाली प्रसुती
- मुंबई - भारताची चीनसोबत सुरू असलेली चर्चा ही सकारात्मकरित्या पुढे जात असून, आपण ती सुरू ठेवणार असल्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या व्हर्च्युअल जन-संवाद रॅलीमध्ये ते बोलत होते.
सविस्तर वाचा - 'सीमाप्रश्नाबाबत चीनसोबत सुरू असलेली चर्चा सकारात्मक'
- कॅरी (अमेरिका) - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या अन्यायकारक मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. कॅरी शहरातील उत्तर कॅरोलिना भागात ख्रिश्चन धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये प्रार्थना आणि पदयात्रा काढली होती. पदयात्रेच्या समारोपावेळी संबंधीत भागातील पोलिसांनी आंदोलक आणि ख्रिश्चन धर्मगुरूंचे पाय धुवून नमस्कार केला. या प्रसंगाला कॅरीचे हंगामी महापौर लोरी बुश यांनी ट्वीट करून दुजोरा दिला आहे. हा एक मार्मिक क्षण असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
सविस्तर वाचा - अमेरिकन पोलिसांकडून कृष्णवर्णीय आंदोलकांचे पाय धुवून आदर व्यक्त
- मलप्पुरम (केरळ) - हत्तिणीला अननसामधून स्फोटके खायला दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. संपूर्ण देशभर याबद्दल प्रतिक्रीया उमटल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सोमवारी (8 जून) एका हत्तीचा मृत्यू झाला आहे. केरळच्या मलप्पुरमध्ये दोन हत्तीच्या लढाईमध्ये एक हत्ती गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याच वेळी त्याचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.
सविस्तर वाचा - केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू
- यवतमाळ - खरीप हंगाम सुरू झाला, तरी राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून आहे. हा कापूस कधी विकला जाईल याच्या चिंतेत सध्या शेतकरी आहे. त्यामुळेच, राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख यांनी सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात यावर प्रशासनाची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या बैठकीनंतर 30 जूनपर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस घेतला जाईल देशमुख यांनी स्पष्ट केले
सविस्तर वाचा - राज्यातील सुमारे दीड लाख शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरीच; जूनअखेरपर्यंत होणार खरेदी..
- मुंबई - शहरी भागाचा अपवाद वगळता राज्यातील लाखो पालकांकडे चांगले मोबाईल नाहीत, त्यामुळे इंटनेट आणि इतर बाबी दूरच राहतात. अशा वेळी राज्यात ऑनलाईन शिक्षण कसे सुरू करणार, असे अनेक प्रश्न आमदारांनी उपस्थित केल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायवाड निरुत्तर झाल्याचे चित्र आज एका बैठकीत समोर आले.
सविस्तर वाचा - 'ऑनलाईन' शिक्षण कसे सुरू करणार? आमदारांच्या प्रश्नांपुढे शिक्षणमंत्री झाल्या निरुत्तर..
- मुंबई - गेल्या एका वर्षांत केलेल्या कामगिरीवरुन, मी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघातील चौथ्या क्रमांकासाठीची जागा निश्चित केली आहे. याचे मला समाधान वाटत आहे. मात्र मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज आहे, असे टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने म्हटलं आहे.
सविस्तर वाचा - चौथ्या क्रमांकासाठी दावेदारी पण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज - श्रेय्यर
- मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यावर संसर्ग होवू नये, म्हणून अनेक उद्योगधंदे बंद करावे लागले. मात्र, IT क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी घरबसल्या काम म्हणजे 'वर्क फ्रॉम होम' ही संकल्पना राबलली. मात्र, लॉकडाऊनच्या या काळात 'वर्क फ्रॉम होम'मुळे अनेक कर्मचाऱ्यांना स्थुलता, लठ्ठपणा, वजन वाढणे यांसारख्या अनेक समस्या उभ्या राहिल्या सतावू लागल्या आहेत. मात्र, वर्क फ्रॉम होम करतानाही या समस्यांवर उपाय आहेत, असे बालरोगतज्ञ डॉ. हेमंत जोशी म्हणाले. या परिस्थितीत काय उपाय करावेत, यासंदर्भात डॉ. जोशी यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. पाहा, ते काय म्हणतायेत?
सविस्तर वाचा - 'वर्क फ्रॉम होम' करताय ना? मग एकदा पाहाच...