- भविष्यात जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही - निशिकांत दुबे
नवी दिल्ली - जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीवरून संसदेमध्ये सोमवारी चर्चा झाली. यावेळी जीडीपी १९३४ मध्ये आला असून त्याआधी जीडीपी नव्हता. जीडीपीला बायबल, रामायण किंवा महाभारत मानून काही हाती लागणार नाही. आज सर्व सामन्य माणसाचा विकास होत असून ते आनंदी आहेत. हे सर्वांत जास्त महत्वाचे आहे. भविष्यात जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही, असे भाजपचे खासदार निशिकांत दुबे बरळले आहेत.
भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असाताना नव्याने जाहीर झालेली आकडेवारी सर्वांनाच धक्का देणारी आहे. दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
- अयोध्या प्रकरणी जमियत उलेमा-ए-हिंदकडून न्यायालयात फेरविचार याचिका दाखल
नवी दिल्ली - अयोध्या प्रकरणी जमियत उलेमा-ए-हिंदकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे. मुस्लिमांच्या या प्रमुख संघटनेने 217 पानांची याचिका दाखल केली आहे.
- अधीर रंजन चौधरी यांची अर्थमंत्र्यावर टीका...
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना निर्बला असे म्हटले आहे. तुमची परिस्थिती पाहून मला तुम्हाला निर्बला म्हणावे वाटत आहे. तुम्ही एक मंत्री असून ही तुम्हाला हवे ते तुम्ही करू शकत नाही, असे चौधरी म्हणाले.
- केंद्रातील सरकार मोदींची नाही तर अंबानी - अडानीची - राहुल गांधी
नवी दिल्ली - काँग्रेस नेता राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. केंद्रातील सरकार ही अंबानी आणि अडानीची सरकार आहे. जिथे भाजपची सरकार आहे. तेथे व्यवसायीकांना जमिनी दिल्या जातात. नागरिकांचे पैसै हिसकावून अंबानी आणि अडानीला देणे हे सरकारचे लक्ष्य आहे, असा हल्लाबोल राहुल गांधींनी भाजपवर केला आहे.
- राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात आरोपींची इच्छामृत्यूची मागणी
नवी दिल्ली - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली आरोपी नलिनी आणि मुरुगनने इच्छा मरणाची मागणी केली आहे. नलिनी दबावामध्ये असून त्यामुळे इच्छामृत्यूची मागणी केल्याचे तिच्या वकिलांनी सांगितले आहे. मुरुगन यांना एकाकी कारावासही पाठविण्यात आल्याने त्यांनी इच्छामृत्यूची मागणी केली आहे.
राजीव गांधी हत्या प्रकरणी १९९१ मध्ये नलिनीला अटक करण्यात आली. तिला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर फाशीची शिक्षा माफ करून जन्मठेपेत रूपांतर करण्यात आलं.
- शिवांगीने रचला इतिहास; भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट
कोची - सब लेफ्टनंट शिवांगी या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत. कोची येथील नौदलाच्या तळावर सध्या त्या कार्यरत आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. मी या क्षणाची कित्येक दिवसांपासून वाट पाहत होते. माझ्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे, अशा भावना शिवांगी यांनी व्यक्त केल्या आहेत.
- रायपूरमध्ये आईसह अडीच वर्षाच्या मुलाला जीवंत जाळले
रायपूर - राज्यातील नकटी गावामध्ये एक दुर्देवी घटना समोर आली आहे. एका महिलेला तिच्या अडीच वर्षाच्या मुलासह जीवंत जाळण्यात आले आहे. मृतदेह पाहून ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.
- 'आधार कार्ड गहाण ठेऊन त्याबदल्यात मिळतोय कांदा'
वाराणसी - देशामधील कांद्याचे दर आभाळाला भिडले आहेत. वाराणसीमध्ये आधार कार्ड गहाण ठेऊन मोबदल्यात कांदा कर्ज म्हणून दिला जात आहे. समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याचे हे दुकान आहे.
- शाहजहांपूर जिल्ह्यातील वैज्ञानिकांनी उसाच्या 3 नव्या प्रजांतीचा लावला शोध
शाहजहांपूर - जिल्ह्यातील ऊस संशोधन केंद्रातील वैज्ञानिकांनी उसाच्या 3 नव्या प्रजांतीचा शोध लावला आहे. 10 वर्षाच्या संशोधनानंतर उसाच्या या 3 नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या संशोधनामुळे देशातील उस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे.
देशभरात विविध ठिकाणी चालणाऱ्या ऊस संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी देशभर १७ संशोधन केंद्रे स्थापन करण्यात आली. अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि चांगला उतारा देणाऱ्या ऊसाच्या नवीन जाती निर्माण करणे आणि त्यांचा प्रसार करणे हे महत्त्वाचे काम केले जाते.
- सुमित्रा महाजन यांचा धक्कादायक खुलासा...
नवी दिल्ली - लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. मी पक्षामध्ये असल्यामुळे सरकारच्या विरोधात काही मुद्द्यांवर बोलू शकत नव्हते, असे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने सुमित्रा महाजन भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.
- भोपाळ गॅस दुर्घटनेला आज 35 वर्षे पूर्ण....
भोपाळ - शहरातील गॅस दुर्घटनेला आज 35 वर्षे पूर्ण झाली आहेत. २ डिसेंबर १९८४ च्या मध्यरात्री मध्य प्रदेशातील भोपाळ येथील 'युनियन कार्बाइड'च्या कारखान्यात मिथील आयसोसायनाइट ऊर्फ मिक वायू वातावरणात सुटून जो प्रचंड अपघात झाला, तो औद्योगिक क्षेत्रातील जगातला आजवरचा सर्वात मोठा अपघात मानला जातो.
या दुर्घटनेत ३,००० हून अधिक लोकांचा काही दिवसांतच मृत्यू झाला, तर जवळपास २०,००० लोकांचा या दुर्घटनेशी निगडित आजारांमुळे मृत्यू ओढवला. भोपाळ वायू दुर्घटना ही उद्योगजगतातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना गणली जाते.
- काँग्रेसच्या माजी आमदाराने दिल्या प्रियंका चोप्रा जिंदाबादच्या घोषणा...
नवी दिल्ली - रविवारी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते 'राहुल गांधी, प्रियंका गांधी जिंदाबाद', अशी घोषणाबाजी करत होते. यावेळी बवाना विधानसभाचे माजी आमदार सुरेंद्र कुमार यांनी प्रियंका चोप्रा जिंदाबाद अशी घोषणा दिल्यामुळे एकच गोंधळ उडाला. सुरेंद्र कुमार यांनी याप्रकरणी कार्यकर्त्यांची माफी मागून वाक्यात सुधारणा करत पुन्हा प्रियंका गांधी जिंदाबाद अशी घोषणा दिली.
- बलात्कार प्रकरणांविषयी मोदी सरकार गंभीर - रामदास आठवले
सहारनपूर - शहरामध्ये दिव्यांगाना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली. यावेळी हैदराबादमधील बलात्कार-हत्या घटनेचा निषेध करत दुःख आणि नाराजी व्यक्त केली. या घटनांविषयी मोदी सरकार गंभीर असून बलात्कार प्रकरणातील आरोपींविरुद्ध कठोर कायदा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.
- राहुल गांधी 4 ते 8 डिसेंबरला वायनाड दौरा करणार
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी 4 ते 8 डिसेंबर केरळमधील वायनाड दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी राहुल 27 ऑगस्टला वायनाड दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी वायनाडमधील पूरग्रस्तांची भेट घेतली होती. राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी वायनाड मतदारसंघातून विजय प्राप्त केला होता.
- जगत प्रकाश नड्डा यांचा आज 59 वा वाढदिवस, मोदींनी दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली - भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचा आज 59 वा वाढदिवस आहे. नड्डा यांचा जन्म 1960 मध्ये पटणा येथे झाला होता. पंतप्रधान मोदींनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
१९८६ पासून नड्डा राजकारांमध्ये सक्रिय आहेत. नड्डा यांनी वयाच्या ३३ व्या वर्षी आमदार म्हणून निवडून आले होते. नड्डा यांना अमित शाह यांचे विश्वासू म्हणून ओळखलं जाते. शिवाय ते आरएसएसचे कट्टर स्वयंसेवकही आहेत. नड्डा यांचे भाजपच्या विजयात मोलाचे योगदान आहे.
- तमिळनाडू राज्यात जोरदार पाऊस; घरे कोसळली,16 जणांचा मृत्यू
चैन्नई - तमिळनाडूमध्ये पावसाने थैमान घातले असून कोईम्बतूर येथे 4 घरे कोसळली आहेत. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
- 16 वर्षांच्या मुलींवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक
बिलासापूर - हैदराबादमधील डॉक्टर महिलेवरील बलात्कार व खूनाच्या प्रकरणानंतर देशात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच बिलासपूर येथे एका 16 वर्षांच्या मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
- प्रेमी युगलाने झाडाला गळफास घेत केली आत्महत्या
शाबाद - घरच्यांनी लग्नाला नकार दिल्याने प्रेमी युगलाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. शाबाद येथे ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पल्लवी (वय 19 )आणि महेंदर (वय 21), अशी दोघांची नावे आहेत.
- भाजप-काँग्रेसपक्षाकडून दिल्ली सरकारविरोधात निदर्शने
नवी दिल्ली - दिल्लीमधील विधानसभा निवडणुका जवळ येत आहे. तसे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोमवारी भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून दिल्ली सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी शहरातील प्रदूषण, पाणी, स्वच्छ हवा आणि सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत आम आदमी पक्षाविरोधात निदर्शन करण्यात आले.
- प्लास्टिकचे प्रदूषण टाळण्यासाठी हैदराबादमधील तरुणाचा अभिनव उपक्रम
हैदराबाद - प्लास्टिकचा वापर कमी करून प्रदूषण टाळण्यासाठी शहरातील दोसापती रामू नावाच्या तरुणाने अभिनव उपक्रम राबवला आहे. तो लोकांकडून प्लास्टिकचा कचरा घेतो आणि त्यांना मोफत एक रोपटे देतो. त्याच्या या उपक्रमाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्याने सांगितले.