सविस्तर वाचा - हिरकणी..! मुलासाठी दिव्यांग मातेचा 1200 किलोमीटरचा प्रवास विशेष दुचाकीवरून प्रवास
- पुणे/अमरावती - देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेला यामधून सुट देण्यात आली आहे. टाळेबंदीमुळे विविध ठिकाणी अडकलेले नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले आहेत. अशात एका दिव्यांग महिलेने आपल्या मुलाला घरी आणण्यासाठी विशेष मोटारसायकलवरून (दिव्यांगासाठीची विशेष मोपेड) तब्बल एक हजार दोनशे किलोमिटरचा प्रवास केला. सोनू खंदारे, असे त्या महिलेचे नाव असून त्या पिंपरी-चिंचवडच्या भोसरी परिसरात राहतात. अमरावतीतील कोकर्डा शेंडगाव येथून आपल्या मुलाला आणले. मी आता शाळेत गेल्यावर मला 'हिरकणीचा मुलगा'म्हणतील, अशी भावना त्यांच्या मुलाने 'ईटीव्ही भारत'समोर व्यक्त केली.
सविस्तर वाचा - राज्यात आज 1165 नवीन कोरोनाग्रस्तांची भर; एकूण रुग्णसंख्या 20 हजार 228
- मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २० हजार २२८ झाली आहे. आज १ हजार १६५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज ३३० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३ हजार ८०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा - कोडोलीमध्ये विहीर खचून 3 जण गाडले गेले तर तिघे बचावले...
- कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात विहीर खचल्यामुळे 6 जण गाडले गेले होते. यांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, तिघेजण अजूनही मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बुल्डोजरच्या साहाय्याने युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. ही घटना आज (शनिवारी) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली.
सविस्तर वाचा - मुंबईत आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे बळी, राज्यात पोलिसांच्या मृत्यूचा आकडा 7 वर
- मुंबई - येथाल विनोभा भावे नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहायक फौजदाराचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सविस्तर वाचा - मध्य प्रदेशात ट्रक पलटी झाल्यामुळे 5 स्थलांतरित मजुरांचा मृत्यू
- नवी दिल्ली - मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे मोठा अपघात झाला आहे. शनिवारी रात्री ट्रक पलटी झाल्यामुळे पाच स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे मजूर तेलंगणातील हैदराबाद येथून उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी जात होते.
सविस्तर वाचा - कांदिवलीत चाळीचा भाग कोसळला, 2 जण जखमी, 12 जणांना सुखरूप बाहेर काढले
- मुंबई - कांदिवली येथील एका चाळीचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे घडली. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन 12 जणांना सुखरूप बाहेर काढले असून ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का यासाठी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
सविस्तर वाचा - विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर, काँग्रेसने दिली दोघांना उमेदवारी
- मुंबई - विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवारही शनिवारी रात्री घोषित केला आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या सहीने प्रकाशित झालेल्या पत्रकात जालन्याचे राजेश राठोड यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित करण्यात आले आहे. तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बीड जिल्हा अध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या नावाचीही घोषणा केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी 6 उमेदवार रिंगणात उतरवणार हे स्पष्ट झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
सविस्तर वाचा - 'हिजबुल मुजाहिदीन'ने घेतली हंदवारामधील हल्ल्याची जबाबदारी..
- नवी दिल्ली - या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या हंदवारामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हिजबुल संघटनेचा प्रमुख सैद सलाहुद्दीन याने याबाबत बोलल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाकव्याप्त काश्मीरमधील असल्याचे म्हटले जात आहे.
सविस्तर वाचा - नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'घूमकेतू' डिजीटल प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज
- मुंबई - अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा आगामी चित्रपट 'घूमकेतू' डिजीटल प्लॅटफॉर्मवरुन रिलीज होणार आहे. झी ५च्या माध्यामातून याचे स्ट्रीमिंग ओटीटीवर होणार आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपट थिएटरमध्ये रिलीज न करता थेट डिजीटल माध्यमातून रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला आहे. त्यामुळे चित्रपट चाहत्यांना घराबाहेर न जाता नवाजचा नवा चित्रपट पाहाता येणार आहे.
सविस्तर वाचा - विराट आणि अनुष्काकडून मुंबई पोलिसांना 10 लाखाची मदत
- मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी पोलीस कल्याण निधीमध्ये प्रत्येकी 5-5 लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी शनिवारी ही माहिती दिली.