ETV Bharat / bharat

Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या! - रात्री नऊच्या दहा ठळक बातम्या

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

ETV Bharat Maharashtra top ten news stories at nine PM
Top 10 @ 9 PM : रात्री नऊच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 7, 2020, 8:47 PM IST

  • मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ हजार १२० झाली आहे. आज दिवसभरात राज्यात १ हजार ३६२ नवीन रुग्णांचे निदान झाले.

सविस्तर वाचा : MAHA CORONA : राज्यात आज 1362 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 18 हजार 120

  • मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदारकी निश्चित झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांची राळ देखील क्षमली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्व विरोधी पक्षांच्या सूचनांची दखल घेतली. कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्षनेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा : कोरोना संकटातून एकजुटीतून महाराष्ट्राला बाहेर काढू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • नवी दिल्ली - विशाखापट्टनम येथील एलजी पॉलिमर इंडस्ट्रीत रासायनिक वायू गळती होऊन ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गुजरातवरून विशेष केमिकल विमानाने आणण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यास परवानगी दिली आहे. या केमिकलमुळे परिसरात पसरलेला वायूचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत होणार आहे.

सविस्तर वाचा : विशाखापट्टनम येथील वायूगळती शमविण्यासाठी गुजरातवरून मागविले केमिकल

  • औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगार राज्यात ठिकठिकाणी अडकून पडले होते. या नागरिकांना आपापल्या गावी पाठवण्यासाठी औरंगाबादहून पहिली रेल्वे आज (गुरुवार) पाठवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बाराशे लोकांना स्वगृही पाठवण्यात आले असून ही रेल्वे विनाथांबा भोपाळला जाणार आहे. मध्यप्रदेश सरकारने राज्यात अडकलेल्या या लोकांना परत आणण्यासाठी एक कोटी रुपये रेल्वेकडे जमा केले. त्यामुळे या सर्व लोकांना पास देण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या सर्वांना रेल्वेत बसवण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिली.

सविस्तर वाचा : औरंगाबादहून मध्यप्रदेशला पहिली रेल्वे रवाना, पहिल्या टप्प्यात बाराशे लोक परतणार स्वगृही

  • नवी दिल्ली - भारातमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे गर्भवती असलेल्या महिलांना प्रसुतीसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर झारखंड सरकारने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील गर्भवती महिलांची यादी तयार केली आहे.

सविस्तर वाचा : वैद्यकीय सुविधा पूरवण्यासाठी राज्यातील गर्भवती महिलांची यादी तयार

  • नवी दिल्ली - इंडियन कौन्सिल ऑफ अ‌ॅग्रिकल्चर रिसर्च (ICAR) संस्थेने गुरुवारी मत्स्य व्यवसायाशी संबधित उद्योग आणि मच्छिमारांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी नियमावली जारी केली आहे. हिंदी, इंग्रजी वगळून इतर १० स्थानिक भाषेत ही नियमावली तयार केली आहे. या क्षेत्राशी संबधित कर्मचारी, व्यवसायिक, मासेमारी करणाऱ्यांनी कोरोना संसर्ग कसा टाळावा याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा : मत्स्य उद्योगाला कोरोनापासून वाचविण्यासाठी ICARने जारी केली नियमावली

  • मुंबई - संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे लोक अडकून पडलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कधी वाढतोय तर कधी कमी होतो आहे. मात्र या सगळ्यापासून दूर असलेल्या मुंबईतील दगडी चाळीत मात्र सध्या आनंदी आनंद आहे. यामागचं कारण आहे डॅडी उर्फ अरुण गवळी यांची धाकटी मुलगी योगिता हीचं लग्न उद्या पार पडणार आहे.

सविस्तर वाचा : ऐन लॉकडाऊनच्या काळात मुंबईतल्या 'दगडी चाळी'त वाजणार 'सनई चौघडे'

  • नवी दिल्ली - पोलीस दलातील जवान अमित राणा (३१) यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यानंतर उपराज्यपाल अनिल बैजल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दु: ख व्यक्त केले आहे. अमितच्या कुटुंबीयांना १ कोटी रक्कम मदत निधी देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. अमित २०१० साली दिल्ली पोलीस दलात भरती झाला होता, त्याच्या परिवारात पत्नी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे.

सविस्तर वाचा : कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू, केजरीवाल सरकार १ कोटी मदतनिधी देणार

  • लखनऊ - विविध राज्यांमध्ये अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या सर्व स्थलांतरित कामगारांना माघारी आणण्याचे योगी आश्वासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. स्थलांतरित कामगारांची यादी मागविण्यात येत आहे. आत्तापर्यंत ३७ रेल्वे गाड्यांतून ३० हजार नागरिकांना राज्यात माघारी आणल्याची माहितीही त्यांनी दिली.

सविस्तर वाचा : 'देशभरात अडकून पडलेल्या सर्व मजुरांना माघारी आणणार'

  • मुंबई - थोर साहित्यिक रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी 'शत शत नमन' करीत त्यांना अभिवादन केले आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी या थोर साहित्यिकाबद्दल आपला आदर व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा : रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त अमिताभ यांनी केले 'शत शत नमन'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.