ETV Bharat / bharat

Top १० @ ११ AM : सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - महत्वाच्या घडामोडी

सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या

Top १० @ ११ AM
सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या
author img

By

Published : Jun 12, 2020, 11:03 AM IST

  • नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशामध्ये 10 हजार 956 कोरोनाबाधित आढळले असून 396 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.

सविस्तर वाचा- गेल्या 24 तासांत आढळले नवे 10 हजार 956 रुग्ण ; तर 396 जणांचा बळी

  • मुंबई - मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर मंत्री अशोक चव्हाण आणि आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.

सविस्तर वाचा- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

  • अमरावती- जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात बोगस बियाण्याची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याच काम प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. कृषी केंद्र व्यवसायिक रामेश्वर अमृतलाल चांडक या आरोपी कडून तबल ९ लाख किंमतीचे १ हजार बॅग बोगस कपाशीचे बियाणे जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी रामेश्वर चांडक सह अन्य दोन आरोपींना अटक करण्यात आली.

सविस्तर वाचा- धामणगाव रेल्वेत ९ लाख किंमतीच्या एक हजार बोगस कपाशी बियाण्याच्या बॅगा जप्त

  • नवी दिल्ली - सलग सहाव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 57 पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर 59 पैसे वाढ झाली आहे. तब्बल 83 दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. दरम्यान गुरुवारी हा दर पेट्रोलसाठी 74 तर डिझेलचा 72.22 रुपये इतका होता.

सविस्तर वाचा- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सहाव्या दिवशी वाढ; पेट्रोल 57, तर डिझेल 59 पैशांनी महागले

  • नांदेड - लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीसह त्यास मदत करणाऱ्या इतरांवर बलात्कारासह अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मंगेश शामराव शिंदे (रा. करोडी ता. हदगाव वय-२३) याला अटक करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा- लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार; हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • मुंबई - सर्वाधिक स्थलांतर झालेल्या महाराष्ट्र राज्यावर भविष्यात अशी वेळ येऊ नये, यासाठी उद्योगांना कुशल, अकुशल तसेच अर्धकुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योग विभागाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या औद्योगिक कामगार ब्युरोची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, जून महिन्याच्या अंतिम आठवड्यात लेबर ब्यूरो कार्यान्वित होईल, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई.

सविस्तर वाचा- 'औद्योगिक कामगार ब्यूरो पोर्टल कार्यान्वित होणार जूनच्या शेवटच्या आठवड्यात'

  • गुवाहाटी (आसाम) - आसाममध्ये तिनसुकिया जिल्ह्यातील बागजन तेल विहिरीला मंगळवारी आग लागली. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि अभियंत्यांनी गुरुवारी तिसऱ्या दिवशीही तेल विहिरीला आग विझवण्यासाठी अधिक तीव्रतेने प्रयत्न करण्यात येत आहेत. या भागातील 35 हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत. तर, जवळपास 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा- आसाम तेलविहीर आग : 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले, 35 घरांचे मोठे नुकसान

  • बंगळुरु - बंगळुरु उच्च न्यायालयाने गुरुवारी अमुल्या लियोनाला जामीन दिला आहे. 20 फेब्रुवरीला सीएए, एनआरसीविरोधी आयोजित करण्यात आलेल्या सभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिल्याने तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सविस्तर वाचा- पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या 'त्या' तरुणीला जामीन

  • मुंबई : राज्याच्या अंतर्गत भागात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील चार तासांमध्ये नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांत पाऊस पडेल अशी माहिती मुंबई (कुलाबा) वेधशाळेचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिली आहे.

सविस्तर वाचा- राज्यात ठिकठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता..

  • मुंबई - शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात खाट न मिळणे, रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचणे यासारख्या तक्रारी रोज येत होत्या. त्यावर, उपाय म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या 24 विभागांमध्ये विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली अंमलात आणण्यासाठी 'वॉर्ड वॉर रूम' सुरू केले आहेत. यामुळे रुग्णांना वेळेवर खाटा आणि रुग्णवाहिका सेवा मिळेल अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाला आहे.

सविस्तर वाचा- कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सुरू झाल्या ‘वॉर्ड वॉर रूम’..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.