- मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, आज कोरोनाच्या ९,८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच, आज ६,४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सविस्तर वाचा : राज्यात आज १० हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद; तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांजवळ..
- मुंबई - मुंबईत आज कोरोनाचे 1,257 नवे रुग्ण आढळून आले असून 55 मृत्यूंची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 5 हजार 829वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 5,927 वर पोहचला आहे. मुंबईत आज एकाच दिवशी 1,984 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सविस्तर वाचा : दिलासादायक! मुंबईत आज नव्या रुग्णांहूनही बरे झालेले रुग्ण अधिक; एकूण संख्या पोहोचली १,०५,८२९वर..
- गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात हातपाय पसरत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 424 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, 286 रुग्ण हे सुरक्षा दलाचे जवान आहेत. नक्षल कारवायांसाठी हॉटस्पॉट असलेल्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यात ज्या जवानांवर नक्षल कारवाया रोखण्याचे आव्हान आहे, त्याच जवानांना आता अलगीकरणात राहून कोरोनाशी लढा द्यावा लागत आहे.
सविस्तर वाचा : Exclusive : सुरक्षा दलाचे 286 जवान कोरोनाबधित, मात्र सुरक्षा यंत्रणा खंबीर! पाहा विशेष मुलाखत...
- मुंबई : डॉक्टर, आरोग्य सेवक पोलीस यांच्याप्रमाणेच विविध महापालिकांचे कर्मचारी देखील कोरोना योद्धेच ठरले आहेत. महामारीपासून सर्वसामान्यांचा बचाव करण्यासाठी हे सर्व योद्धे जीवाचे रान करत आहेत. पण कोरोनाचा विळखा या योद्ध्यांनाही बसला आहे. त्यात विविध पालिकांच्या कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. यासंर्भात 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला विशेष आढावा...
सविस्तर वाचा : ईटीव्ही भारत विशेष: राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांची कोरोना काळात दमदार कामगिरी
- ठाणे - ठाणे महानगपालिकेचे कळवा स्थित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेहमीच गडबड घोटाळा होत असल्याचे आढळून आले आहे. आता पुन्हा एकदा या रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत. येथील दोन कोरोनाबाधित रुग्णांनी पळ काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सविस्तर वाचा : ठाण्यातील कळवा रुग्णालयातून दोन कोरोना रुग्ण पळाले
- मुंबई-- सर्वसामान्यांना कोरोनाची लागण होत असताना कोरोना योद्धा म्हणून आघाडीवर लढणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा आहे. राज्याच्या आयुष टास्क फोर्सच्या माहितीनुसार राज्यात कोरोनामुळे 86 आयुष डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. आयुष डॉक्टरांनाही 50 लाखांचा विमा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
सविस्तर वाचा : चिंताजनक! कोरोनामुळे राज्यातील 86 आयुष डॉक्टरांचा मृत्यू, 50 लाखांचा विमा देण्याची मागणी
- नवी दिल्ली - नवनियुक्त राज्यसभा सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम काल(बुधवार) राज्यसभेत पार पडला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली होती. त्याला राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध दर्शवला होता. शपथविधी सुरू असताना घोषणा देण्यास परवानगी नाही, असे ते म्हणाले होते. मात्र, यावरून शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्यंकय्या नायडू यांच्यावर सोशल मीडियातूनही शिवप्रेमींकडून टीका होत आहे. यावर आता व्यंकय्या नायडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सविस्तर वाचा : शिवाजी महाराजांचा आदरच, मात्र.... घोषणा वादावर व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया
- मुंबई - राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा घेऊ नये, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना आज दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास तसेच राज्यात परीक्षेला अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
सविस्तर वाचा : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको; अमित देशमुखांच्या कुलगुरुंना सूचना
- नवी दिल्ली : लष्करात महिलांच्या कायमस्वरुपी नियुक्ती करण्याबाबत केंद्र सरकारने आदेश जारी केला आहे. फेब्रुवारीमध्ये यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले होते. यानंतर आता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने या निर्णयाला अधिकृत मंजूरी दिली आहे.
सविस्तर वाचा : महिलांची लष्करात कायमस्वरुपी नियुक्ती; केंद्र सरकारने जारी केला आदेश..
- पुणे - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ पूर्ण झाल्यानंतर शेवटी त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी', असा जयघोष केला. उदयनराजेंनी अशी घोषणा दिल्यानंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मात्र उदयनराजेंना समज दिली. हा शपथविधी सोहळा माझ्या दालनात होत आहे, इथे घोषणा देण्यासाठी परवानगी नाही आणि हे पटलावर रेकॉर्ड होणार नाही, असेही सांगितले.
सविस्तर वाचा : 'जगभर लुंगी घालून फिरणाऱ्या व्यंकय्या नायडूंचा शिवरायांच्या घोषणेला विरोध का?'