ETV Bharat / bharat

गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली

महात्मा गांधींची १५० वी जयंती भारतात उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. हेच निमित्त साधून, ईटीव्ही भारत देखील एका विशेष उपक्रमाद्वारे गांधीजींना श्रद्धांजली वाहत, देशातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आपल्या आवाजामध्ये देशभरातील विविध गायक-गायिकांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे. पाहा विशेष भजन...

spirit of Mahatma Gandhi
author img

By

Published : Oct 1, 2019, 9:25 PM IST

Updated : Oct 2, 2019, 10:52 AM IST

हैदराबाद - विविधतेने नटलेला, प्राचीन संस्कृतींची ओळख असलेला आणि सर्वांग सुंदर असा भारत देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत आहे. हेच निमित्त साधून, ईटीव्ही भारतने एका विशेष उपक्रम राबवत गांधीजींना श्रद्धांजली वाहत, देशातील वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे.

गांधीजींच्या आवडत्या भजनांपैकी एक म्हणजे, "वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड़ पराई जाने रे, पर दुख्खे उपकार करे तोये, मन अभिमान न आने रे..." हे आहे. या भजनामध्ये, प्रत्येकासाठी मनात करुणा असलेल्या एका वैष्णवाच्या जीवनाचे आणि त्याच्या आदर्शांचे अत्यंत सुंदर असे वर्णन करण्यात आले आहे. १५ व्या शतकातील गुजराती कवी नरसिंह मेहता, यांच्या भजनांद्वारे देशाला एकत्र जोडण्याची संकल्पना 'ईटीव्ही भारत'ने मांडली.

ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली

नरसिंह मेहता यांच्या साहित्यात आढळणारा साधेपणा, भक्ती, निर्भयपणा आणि निर्मळपणा बापूंनी आपल्या भजनांमध्ये उतरवला होता. त्यांच्या भजनांमुळे विविध जाती-धर्माचे आणि वेगवेगळ्या वर्गांतील लोक एकत्र आले होते. ही त्याकाळची गरजदेखील होती. अहिंसा आणि बंधुतेचा प्रचार प्रसार करण्यासाठी महात्मा गांधींची भजने लोकप्रिय झाली होती. लोक ही भजने आवडीने म्हणत. साबरमती आश्रमामध्ये तर एकत्रित भजन गायन हा दिनचर्येचाच भाग झाला होता.

हेही वाचा : गांधी @150 : रामोजी ग्रुपचे चेअरमन रामोजी राव यांनी लॉंच केले बापूंचे प्रिय भजन

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, असे आपण बालपणापासून रुजवत आलो आहे. प्राचीन संस्कृती, विविध परंपरा, वैविध्यपूर्ण खान-पान, वैचारिक स्वातंत्र्य असलेले लोक भारतात मिळून-मिसळून राहतात. 'ईटीव्ही भारत'देखील १३ भाषांमध्ये माहिती प्रसिद्ध करुन, भारतातील या विविधतेतील एकतेचे संवर्धन, जतन करण्याचा एक मौल्यवान प्रयोग केला आहे.

डिजीटल व्यासपीठ असूनदेखील, केवळ शहरांवर लक्ष केंद्रीत न करता, भारताच्या प्रत्येक गावापर्यंत, व्यक्तीपर्यंत ईटीव्ही भारत पोहोचत आहे. केवळ शहरी भागांमधीलच नव्हे, तर खेड्या-पाड्यांमधील प्रत्येक व्यक्तीला भक्कम व्यासपीठ मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम ईटीव्ही भारत करत आहे.

या भजनाच्या माध्यमातून नरसिंह मेहता यांच्या लिखाणात प्रकट झालेल्या सामान्य माणसाच्या परिक्षा आणि समस्या ठळकपणे समोर आल्या आहेत. विविधतेमध्येच भारताचे सौंदर्य दडले आहे. विविधतेतील एकतेत देशाची ताकद आहे. हीच विविधता अधोरेखीत करण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील उत्कृष्ट गायकांना एका व्यासपीठावर आणले आहे.

हेही वाचा : गांधीजी @ १५०: ईटीव्ही भारतने लॉंच केलेल्या विशेष गीताचे पियूष गोयल,व्यंकय्या नायडूंकडून कौतुक

यात पी. उन्नीकृष्णन (तमिळ), एस. पी. बाला सुब्रमण्यम (तेलुगु), पी. विजय शंकर (कन्नड), योगेश गढवी (गुजराती), पुलक बॅनर्जी (आसामी), वैशाली माडे (मराठी), के. एस. चित्रा (मल्याळम), शंकर साहनी (पंजाबी), हेमंती शुक्ला (बंगाली), सुभाष चंद्र दास (ओडिया) तसेच छन्नूलाल मिश्रा आणि सलामत खान (हिंदी) यांचा समावेश आहे.

रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलूरी वासू राव यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले असून अजित नाग यांनी दिग्दर्शन केले आहे. देशातील समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचे या गाण्यात दर्शन होते.

Intro:Body:

हैदराबाद - विस्तीर्ण पसरलेला, विविधतापूर्ण आणि सुंदर असा आपला भारत देश महात्मा गांधींची १५० वी जयंती उत्साहाने साजरी करत आहे. हेच निमित्त साधून, ईटीव्ही भारत देखील एका विशेष उपक्रमाद्वारे गांधीजींना श्रद्धांजली वाहत, देशातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे.

गांधीजींच्या आवडत्या भजनांपैकी एक म्हणजे, "वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड़ पराई जाने रे, पर दुख्खे उपकार करे तोये, मन अभिमान न आने रे..." या भजनामध्ये, प्रत्येकासाठी मनात करूणा असलेल्या एका वैष्णवाच्या जीवनाचे आणि त्याच्या आदर्शांचे सुंदर असे वर्णन केले आहे. १५व्या शतकातील गुजराती कवी नरसिंह मेहता, यांच्या भजनांद्वारे आपल्या देशाला एकत्र जोडण्याची संकल्पना 'ईटीव्ही भारत'ने मांडली.

गुजराती कविता साहित्याचे आदी कवी नरसी भगत यांच्या साहित्यात आढळणारा साधेपणा, भक्ती, निर्भयपणा आणि निर्मळपणा बापूंनी आपल्या भजनांमध्ये उतरवला होता. त्यांच्या भजनांमुळे विविध जाती-धर्माचे आणि वेगवेगळ्या वर्गांतील लोक एकत्र येत. ही त्याकाळची गरज देखील होती. अहिंसा आणि बंधुतेचा प्रसार करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक हे महात्मा गांधींच्या भजनांचा वापर करत. लोक त्यांची भजने आवडीने गात. साबरमती आश्रमामध्ये तर एकत्रित भजन गायन हा दिनचर्येचाच भाग होता.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असे आपण लहानपणापासून म्हणत आलो आहे. भारतामध्ये विविध प्रकारची संस्कृती आणि परंपरा असलेले लोक मिळून राहतात. 'ईटीव्ही भारत'देखील १३ भाषांमध्ये माहिती प्रसारित करून, भारतातील या विविधतेतील एकतेचे संवर्धन करत आहे.

 एक डिजीटल व्यासपीठ असूनदेखील, केवळ शहरांवर लक्ष केंद्रीत न करता, भारताच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत ईटीव्ही भारत पोहोचत आहे. केवळ शहरी भागांमधीलच नव्हे, तर खेड्या-पाड्यांमधील प्रत्येक व्यक्तीला व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ईटीव्ही भारत करत आहे. ज्यामुळे, नरसिंह मेहता यांच्या लिखाणात नमूद केलेल्या सामान्य माणसाच्या चाचण्या आणि समस्या ठळकपणे समोर येत आहेत.

भारताच्या विविधतेमध्येच भारताचे सौंदर्य आहे. विविधतेतील एकतेमध्ये भारताची ताकद आहे. भारताची हीच विविधता दाखवण्यासाठी, 'ईटीव्ही भारत'ने भारताच्या वेगवेगळ्या भागांमधील उत्कृष्ट गायकांपैकी काही गायकांना एकाच व्यासपीठावर आणले आहे.

या गायक-गायिकांमध्ये पी. उन्नीकृष्णन (तामिळ), एस. पी. बाला सुब्रमण्यम (तेलुगु), पी. विजय शंकर (कन्नड), योगेश गढवी (गुजराती), पुलक बॅनर्जी (आसामी), वैशाली माडे (मराठी), के. एस. चित्रा (मल्याळम), शंकर साहनी (पंजाबी), हैमंती शुक्ला (बंगाली), सुभाष चंद्र दास (ओडिया) तसेच छन्नूलाल मिश्रा आणि सलामत खान (हिंदी) यांचा समावेश आहे. रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आपल्या आवाजामध्ये त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सलूरी वासू राव यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. तर, अजित नाग यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. देशाच्या विविध भागातील समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे या गाण्यात दर्शन होते.

Conclusion:
Last Updated : Oct 2, 2019, 10:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.