फुलपरास - येत्या 28 ऑक्टोबरला बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला प्रारंभ होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रचार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी फुरपसार मतदार संघात रॅलीला संबोधित केले. यावेळी बोलतांनी नितीश कुमार यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली, विरोधकांना त्यांचे नातेवाई, बायका, मुले हेच सर्व काही आहेत. आपल्या नातेवाईकांचा फायदा कसा होईल, याचाच विरोधक विचार करतांना दिसत आहेत. मात्र बिहारमधील जनता हेच माझे कुटुंब आहे, आणि त्यांची रक्षा करणे हे माझे कर्तव्य आहे. असे नितीश कुमार यांनी या रॅलीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान पुढे बोलताना नितीश म्हणाले की, बिहारमध्ये मागील काही वर्षांमध्ये गुन्हेगारीत वाढ झाली होती. राज्यात रोजगार नव्हता. विकास कामे झाली नव्हती, मात्र जदयू सत्तेत आल्यापासून सर्व परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. राज्याचा विकास होताना दिसत आहे. जर राज्याला पुढे जाताना पहायचे असेल तर जदयूच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी मतदारांना केले.