ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक ; एकाचा खात्मा - security

पुलवामा जिल्ह्यामधील त्राल भागातील जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये गोळीबार चालु आहे.

दहशतवादी
author img

By

Published : Jun 26, 2019, 10:05 AM IST

Updated : Jun 26, 2019, 12:11 PM IST

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागातील जंगलात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. दरम्यान किमान दोन ते तीन अतिरेकी या भागात अडकल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

४२ राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफचे जवान घटनास्थळी आहेत.

जंगल भागात दोन ते तीन दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे.

आज सकाळी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 26, 2019, 12:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.