श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथील रेबन भागात रविवारी सकाळी दशहतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. पोलीस व सुरक्षा दलाने दहशतवाद्याविरोधात संयुक्त मोहिम राबवली.
यापूर्वी 11 जुलैला जम्मू-काश्मीरमधील नौगम सेक्टरमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. त्याच्याजवळून दोन एके-47 रायफल्ससह शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नियंत्रण रेषा पार करून दशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सेना सक्रिय असल्याचे मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी सांगितले.
दरम्यान जून सुरक्षा दलांनी या महिन्यात विविध दहशतवादी विरोधी कारवाया केल्या. त्यात 48 दहशतवादी ठार झाले, ठार झालेल्यांमध्ये अनेक कमांडरचाही सामवेश आहे. 2020 मध्ये आत्तापर्यंत 128 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही माहीती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली.