श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या चकमकीत आत्तापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. तर एक लष्करी अधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील पट्टन भागात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे. भारतीय लष्कराने याबाबत अधिकृत माहिती दिली.
शुक्रवारी सकाळपासून बारामुल्ला जिल्ह्यातील येदीपोरा आणि पट्टण भागांमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर गोळीबार केला, आणि चकमकीस सुरूवात झाली. यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार एक लष्करी अधिकारी जखमी झाल्याचे समजले आहे. या अधिकाऱ्याला ९२ बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, ही चकमक अद्यापही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
-
#UPDATE Two more terrorists killed (total 03) in an ongoing encounter at Pattan, Baramulla district. Search operation going on: Jammu and Kashmir Police https://t.co/d4vOi0SOwJ
— ANI (@ANI) September 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE Two more terrorists killed (total 03) in an ongoing encounter at Pattan, Baramulla district. Search operation going on: Jammu and Kashmir Police https://t.co/d4vOi0SOwJ
— ANI (@ANI) September 4, 2020#UPDATE Two more terrorists killed (total 03) in an ongoing encounter at Pattan, Baramulla district. Search operation going on: Jammu and Kashmir Police https://t.co/d4vOi0SOwJ
— ANI (@ANI) September 4, 2020
बारामुल्लात दोन दहशतवादी तळ नष्ट
३० ऑगस्टला बारामुल्लाच्या रामपूर सेक्टरमध्ये काही संशयित व्यक्ती आढळून आल्या होत्या. त्यांच्या हालचालींवर सुरक्षा पथके लक्ष ठेऊन होती. त्यानंतर केलेल्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. डोंगराळ आणि घनदाट झाडी असलेला भूभाग, खराब हवामान अशा परिस्थितीत घुरखोरीची शक्यता अधिक असते. त्यामुळे सीमेवर गस्त वाढविण्यात आली होती. रात्रीच्या वेळीही या भागास्त गस्त घालण्यात येत होती. सात तासांच्या सर्च ऑपरेशननंतर लष्कराला दोन दहशतवादी तळ आढळून आले होते. येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लष्कराने जप्त केला होता.