ETV Bharat / bharat

J-K: शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान?

author img

By

Published : Jun 7, 2020, 9:17 AM IST

Updated : Jun 7, 2020, 11:44 AM IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या जवानांची मोहीम घातली घेतली आहे. आज सकाळपासून (रविवार) दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्याच्या रेबेन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे.

Encounter begins in Jammu and Kashmir's Shopian
शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू...

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाच्या जवानांची मोहीम घातली घेतली आहे. आज सकाळपासून (रविवार) दक्षिण काश्मीरमधील शोपिया जिल्ह्याच्या रेबेन परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. यात जवानांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे.

'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाच्या जवानांना दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. तेव्हा पोलीस, आरआर आर्मी आणि सीआरपीएफ 178bn च्या जवानांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. त्यांनी शोपियाच्या रेबन गावाला घेरा घालत दहशतवाद्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान, लपलेल्या दहशतवाद्यांनी अचानक जवानांवर गोळीबार सुरू केला. तेव्हा जवानानींही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. दोन ते तीन दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती मिळत आहे.

शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक...

दरम्यान, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील तीन तरुणांना समुपदेशन करून दहशतवाद्यांच्या गटात सामील करण्याचा डाव सुरक्षा दलाने हाणून पाडला होता. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल आणि किशोर येथील मुलांवर समुपदेशन करण्यात येत होते. त्यांच्यावर समुपदेशन करणाऱ्या दोघांना जवानांनी अटक केली. रिझवान अहमद वानी आणि रईस अहमद चोपान असे अटक करण्यात आलेल्यांची नावे असून ते मंदुरा गावचे रहिवाशी आहेत. त्राल परिसरातील पन्नर, मंदूर, चंकितरार, रत्सुना येथून लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेच्या दहशतवाद्यांना रसद, निवारा देणे आणि अन्य मदत पुरवली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - काश्मीरच्या तरुणांवरील दहशतवादी समुपदेशनाचा डाव उधळलला

हेही वाचा - गुजरात राज्यसभा : तिघांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने उर्वरित आमदारांना रिसॉर्टमध्ये पाठवले

Last Updated : Jun 7, 2020, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.