ETV Bharat / bharat

मुझफ्फरपूरमध्ये शुक्रवारपर्यंत 'चमकी'चे १३३ बळी - एसकेएमसीएच

श्रीकृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (एसकेएमसीएच) सर्वात जास्त रुग्णांची संख्या आहे. आतापर्यंत येथे ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, केजरीवाल रुग्णालयात २१ जणांचा मृत्यू झाला आहे.

चमकीचे बळी
author img

By

Published : Jun 28, 2019, 11:39 PM IST

मुझफ्फरपूर - बिहारमधील मुझफ्फरमधील चमकी बळींचा आकडा शुक्रवारपर्यंत १३३ पर्यंत पोहचला आहे. जिह्यातील चमकीचे मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत नसून दिवसेंदिवस रुग्णालयात चमकीच्या रुग्णांचे मृत्यू होत आहेत.

अधिकृत माहितीनुसार, मुझफ्फपूर जिल्ह्यातील श्रीकृष्णा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (एसकेएमसीएच) सर्वात जास्त रुग्णांची संख्या आहे. आतापर्यंत येथे ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, केजरीवाल रुग्णालयात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. चमकीच्या रुग्णांच्या उपचारासाठी विशेष वैद्यकीय डॉक्टरांची टीम स्थापन करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २४ जून रोजी चमकीमुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली होती. सोबतच बिहार सरकारकडे याबाबत स्पष्टीकरणही मागितले होते. यावर, बिहार सरकारने स्पष्टीकरण देताना सांगितले, की सरकारने योग्य ती पाऊले उचलली आहेत. परिस्थिती सद्या नियंत्रणात असून रुग्णांची संख्या घटत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी चमकीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ४ लाख रुपयांचा निधी दिला आहे. यासोबतच त्यांनी आरोग्य विभागाला आवश्यक ती उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच डॉक्टरांनी तातडीने मुलांवर उपचार करण्याचे आवाहन केले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.